चौके | प्रतिनिधी : ज्ञानदीप विद्यालय वायंगणी आणि पंचायत समिती मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या 50 व्या विज्ञान प्रदर्शनात भ.ता.चव्हाण, म.मा. विद्यालय चौके या प्रशालेने प्रथम क्रमांक पटकवला. कु केदार मुकुंद डिचोलकर आणि कु साहिल अनंत सावंत या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या “द्विऊदेदशीय शेगडी “या प्रतिकृतीला प्रथम क्रमांक प्राप्त झाला.या प्रतिकृतीची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी मालवण गटशिक्षणाधिकारी श्री संजय माने, शिक्षण विस्तार अधिकारी श्री दीक्षित साहेब, वायंगणी हायस्कुल चे मुख्याध्यापक श्री टकले सर,संस्था सचिव श्री जोशी,केंद्रप्रमुख व इतर मान्यवर उपस्थित होते.विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षक श्री. प्रसाद परुळेकर यांचे मार्गदर्शन लाभले.विद्यार्थ्यांचे स्थानिक समिती अध्यक्ष श्री बिजेंद्र गावडे, मुख्याध्यापक श्री विजय गावकर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.