श्रध्दा आणि अंधश्रध्दा यातील फरक समजणे आवश्यक- ॲड. राजीव बिले

 

अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती कुडाळ तालुकाध्यक्ष पदी ॲड समिर कुळकर्णी यांची निवड

स्वप्नील कदम (कुडाळ) श्रध्दा आणि अंधश्रध्दा यातील फरक समजणे आवश्यक आहे. अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती हि कोणत्याही मंदिर व मंदिरातील देवाच्या विरोधात नाही. तर समाजात भोंदूपणा व जादूटोणा पसरविणा-या दुष्ट विचारांविरोधात काम करणारी चळवळ आहे. त्यामुळे श्रध्दा व अंधश्रध्दा यातील फरक समजून घेणे आवश्यक असल्याचे मत जिल्हाध्यक्ष ॲड.राजीव बिले यांनी व्यक्त केले.

 

अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग आयोजित कुडाळ हायस्कूल कुडाळ येथे जिल्हाध्यक्ष ॲड.राजीव बिले यांचे अध्यक्षतेखालील व जिल्हासंघटक श्री विजय चौकेकर ,जिल्हासचिव प्रा.अजित कानशिडे सर यांचे प्रमुख उपस्थितीत सभा संपन्न झाली. यावेळी कुडाळ तालुका कार्यकारिणी निवडण्यात आली.तालुकाध्यक्ष पदी ॲड.समिर सुभाष कुळकर्णी ,संघटक पदी ॲड.राजीव रमेश कुडाळकर,खजिनदार पदी ॲड.गौरी नारायण आपटे ,कार्याध्यक्ष पदी श्री सचिन मदने ,उपाध्यक्ष पदी ॲड.संजय वसंत खानोलकर ,सचिव पदी ॲड.हेमांगी दिपक वराडकर ,महिला संघटक पदी सौ उज्वला विजय येळाविकर यांची निवड करण्यात आली.
यावेळी सौ राजश्री सावंत,श्री वरद सावंत, ॲड.अमित सावंत ,श्री एजाज नाईक,श्री रविंद्र परब ,सौ सुप्रिया मेहता , ॲड.गोपाळ प्रभू आदी उपस्थित होते.

 

अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा.श्याम मानव यांचे या चळवळीबद्दलचे विचारांचे महत्त्व व समाजात पसरलेल्या गैरसमजूतीबाबत मार्गदर्शन जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी केले. स्वागत व आभार सचिव प्रा.अजित कानशिडे यांनी मानले.