ओटवणे येथे हनुमान जयंती निमीत्त कार्यक्रम

 

ओटवणे(प्रतिनीधी) दरवर्षी प्रमाणे या वर्षीही मंगळवारी २३ एप्रिल रोजी ओटवणे हनुमान मंदीर येथे हनुमान जन्मोत्सवा निमीत्त मंदिरात विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

        सकाळी ९ते१० वैयक्तिक अभिषेक,११ वा. श्री सत्य हनुमंताची महापूजा, दु.१२.३० वा. महाआरती, दु.१.३० वा. महाप्रसाद, साय.४ ते ६ श्री रामरक्षा स्तोत्राचे पारायण, साय.७ ते ८ माऊली हरिपाठ सारकर्ते दशरथ नाईक, रात्रौ ८ वा.स्वरधारा भजन मंडळ तांबुळी बुवा अमित तांबुळ कर यांचे सुश्राव्य भजन, रात्रौ ९ वाजता सत्कार समारंभ, तर रात्रौ १० वाजता सुहास गावडे प्रस्तुत हेळेकर दशावतार नाटय मंडळ कारिवडे यांचा दशावतार नाटय प्रयोग सादर होणार आहे तरी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन हनुमान मिञ मंडळ यांसकडून करण्यात आले आहे.