ठेकेदारी व भ्रष्टाचारासाठी फक्त खासदारकीचा वापर
संभाषणाच्या ऑडिओ क्लिपही जाहीर करणार!
सिंधुनगरी : प्रतिनिधी
खासदार विनायक राऊत यांनी केलेल्या पाणी घोटाळ्यापाठोपाठ मायनिंग व रेडी पोर्ट मध्ये करोड रुपयांचे ठेके काही कंपन्यांच्या नावाने घेतले आहेत. आपला मुलगा, आपला भाचा व आपल्या कुटुंबाला फायदा करून देण्यासाठी, आपल्या खासदारकीचा वापर केल्याचे अनेक पुरावे आता समोर येत आहेत. गेल्या दहा वर्षात खासदारकीचा गैरवापर केल्याबाबतचे त्यांच्या संभाषणाचे ऑडिओ क्लिप 1 ते 7 मे या कालावधीत जाहीर करून खासदार विनायक राऊत यांचा ठेकेदारी व भ्रष्टाचाराने बरबटलेला चेहरा उघडा करणार असल्याची माहिती कुडाळ विधानसभा प्रमुख तथा भाजप नेते निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मायनिंग क्षेत्र व रेडी पोर्टशी आपला कसलाही संबंध नाही, याबाबत कोणताही ठोस पुरावा आला तर राजकारणातून संन्यास घेईन असे वक्तव्य करणाऱ्या खासदार विनायक राऊत यांचा मुलगा गितेश राऊत, त्यांचा भाचा शैलेश परब, शैलेश परब यांचा मुलगा हिमांशू परब व सिद्धेश नाईक या सर्वांचा फोटो रेडी पोर्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम एम पाल यांच्यासोबत घेतलेला आहे. व तो फोटो रेडी पोर्ट मध्येच घेतला आहे. विनायक राऊत यांचा मुलगा व नातेवाईक यांना काही कंपन्यांच्या नावाने रेडी पोर्ट मधील ठेकेदारी देण्यात आली असून ही ठेकेदारी मिळवण्यासाठी खासदार पदाचा वापर त्यांनी केल्याचे उघड होत आहे. लांजा येथे केलेल्या पाणी घोटाळ्यापाठोपाठ त्यानी रेडी पोर्ट मधील ठेकेदारी मिळवण्यासाठी आपल्या खासदारकीचा गैरवापर केला. त्यांचा मुलगा त्यांचे नातेवाईक टेडी पोर्ट मध्ये असल्याचा फोटो यावेळी निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांना दाखविला. एवढा ठोस पुरावा असताना राजकारणातून संन्यास येण्याची भाषा करणारे विनायक राऊत हा संन्यास घेतील का? असा असा सवालही निलेश राणे यांनी केला.
जय भवानी व हिंदू धर्म याचा आव उद्धव ठाकरे आणत असून, हिंदू धर्माचे ते ढोंग करत आहेत. ते मुख्यमंत्री असताना पालघर मध्ये हिंदू साधूंना मारल गेलं, हिंदू धर्मातील हनुमान चालीसा मध्ये राणा दांपत्याला अटक केली यावरूनच त्यांचे हिंदू धर्मावरील प्रेम किती आहे हे उघड होते. निवडणुकीपुरता हिंदू धर्माचा वापर करायचा व हे हिंदू धर्माचे म्हणून ढोंग करून सोयीचे राजकारण करायचे हेच उद्धव ठाकरें करीत असल्याबाबत पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना निलेश राणे यांनी सांगितले. संजय राऊत यांच्या बद्दल पत्रकारांनी विचारले असता एका महिलेबद्दल भर सभेत संजय राऊत ज्या पद्धतीने बोलतात त्याबद्दल संताप येतो. नवनीत राणा भाजपाच्या खासदार म्हणून उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल अपशब्द वापरताना आपली पण बायको आहे आपली पण मुलगी आहे याचे भान संजय राऊत आणि ठेवावे, अन्यथा आम्हालाही बोलावे लागेल असा इशाराही निलेश राणे यांनी दिला.
खंबाटामुळे कामगार देशोधडीला लागले याबाबत पत्रकारांनी छेडले असता निलेश राणे म्हणाले खासदार विनायक राऊत यांनी केलेल्या भ्रष्टाचार मुळे खंबाटा बंद पडली व ते कामगार देशोधडीला लागले हे खरे आहे. वाकोला येथे अशीच परिस्थिती आहे. सहाशे मराठी कुटुंबे असून झोपडपट्टी असलेल्या या भागात खासदार विनायक राऊत यांनी पुढारपण केले व बिल्डरला हाताशी धरून या मराठी कुटुंबांनाही अजूनही तात्काळ ठेवले याबाबतही त्यांनी लक्ष वेधले.
निर्भय बनो बाबत पत्रकारांनी छेडले असता एडवोकेट असीम सरोदे हे सुपारी वकील आहेत काँग्रेसची त्यांनी सुपारी घेतली आहे. त्यामुळे ते ज्या ज्या ठिकाणी जाऊन प्रचार सभा घेतील त्या त्या ठिकाणी भाजपलाच मतदान होईल असेही निलेश राणे म्हणाले.
नाराजांची समजूत काढू.
महायुती सोबत असलेल्या शिवसेनेच्या काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे याबाबत पत्रकारांनी त्यांचे लक्ष वेधले असता निलेश राणे म्हणाले नाराजांची आम्ही समजूत काढू.
राजसाहेबांबद्दल बोलण्याची राऊतांची पात्रता नाही!
मनसे नेते राज ठाकरे यांच्या नखाचीही सर खासदार विनायक राऊत यांना नाही. राज ठाकरे यांच्या सभांची होणारी गर्दी, त्यांचे चाहते त्यांचे कार्यकर्ते फार मोठे असून राज साहेबांबद्दल खासदार विनायक राउतांची तुलना होऊ शकत नाही. व तेवढी लायकी पण नाही अशा शब्दात पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना भाजप नेते निलेश राणे यांनी खासदार विनायक राऊत ना फटकारले!
राऊतांच्या पाणी चोरीची चौकशी सुरू
लांजा तालुक्यात झालेल्या जलजीवन कामातील पाणी घोटाळ्या बाबत व झालेल्या भ्रष्टाचाराबाबत लासलुचपत प्रतिबंधक विभाग, पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन, व कोकण आयुक्तांकडेही तक्रारी केल्या आहेत. त्याची चौकशी सुरू झाली असून त्यासंदर्भातील नोटिसा लवकरच खासदार विनायक राऊत यांना मिळतील असेही या संदर्भात बोलताना भाजप नेते निलेश राणे यांनी स्पष्ट केले












