वेंगुर्लेतील टेकडीवर हनुमान मंदिरात जन्मोत्सवानिमित्त उपक्रम..
वेंगुर्ले | दाजी नाईक : शक्तीची देवता श्री देव हनुमान यांची हनुमान जयंती दिवशी उपासना केली जाते. त्याचाच एक भाग म्हणून वेंगुर्ले शहरातील गाडीअड्डा येथील टेकडीवर असलेल्या हनुमान मंदिरात आज शेकडो हनुमान भक्तांनी मारुती स्तोत्र याचा जयघोष व पठण करत ५००० जोर व बैठकांचा अभिषेक मारुतीच्या चरणी अर्पण केला. येथील सातेरी व्यायाम शाळेचा हा उपक्रम गेली ३५ वर्ष सुरू आहे. त्याला दरवर्षी चांगला प्रतिसाद मिळतो असे व्यायाम शाळेचे प्रशिक्षक व्यायाम पटू किशोर सोनसुरकर यांनी सांगितले.
टेकडीवरील या हनुमान मंदिरात बजरंग बली की जय.. जय श्रीराम.. हर हर महादेव अशा घोषणा देत आज हनुमान जन्मोत्सवा वेळी सकाळी सहा वाजता तरुण ,तरुणी महिला व पुरुष यांनी जोर आणि बैठकांचा अभिषेक बजरंग बलीवर अर्पण करत या जन्मोत्सवात सहभाग घेतला. आजची तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे वळत आहे त्याचबरोबर विद्यार्थी वर्ग हा मोबाईल मध्ये गुंतत असतानाच त्यांना आपले सुदृढ आरोग्य व तल्लक बुद्धी बनविण्यासाठी व्यायाम हा महत्त्वाचा आहे. त्यामुळे व्यायामाची देवता श्री हनुमान यांच्या जयंतीदिनी शेकडो हनुमान भक्तांनी मारुती स्तोत्र याचा जयघोष व पठण करत ५००० जोर व बैठकांचा अभिषेक मारुतीच्या चरणी अर्पण केला. यातून आजच्या युवा वर्गाला व्यायामाची आवड निर्माण व्हावी हा यामागचा उद्देश आहे.
वेंगुर्ले येथील टेकडीवर विरासन हे हनुमान मंदिर आहे. त्यामुळे या मंदिरात जाण्यासाठी ट्रेकिंगचा अनुभव करतच या मंदिरात जावे लागते. त्यामुळे तेथे पोहोचल्यानंतर आज हनुमान भक्तांनी आगळावेगळा जोर बैठकांचा अनुभव घेत आनंद लुटला.










