अबकी बार ४०० पार करण्यासाठी तुमचा हक्काचा माणूस लोकसभेवर पाठवा…

निलमताई राणे यांचे तुळस येथील महायुती महिला मेळाव्यात आवाहन

वेंगुर्ले | दाजी नाईक : अबकी बार ४०० पार करण्यासाठी तुमचा हक्काचा माणूस लोकसभेवर पाठवा. महिलांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी राणे कुटुंब सदैव तत्पर आहे. आपण आता पर्यंत जसं प्रेम आणि आशिर्वाद नारायण राणे साहेबांना दिलात तसंच प्रेम आणि आशिर्वाद राणे साहेबांच्या “कमळ” या निशाणी समोरील बटन येत्या ७ मे ला दाबून द्या. त्यांना विजयी करा असे आवाहन सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा सौ. निलमताई राणे यांनी तुळस येथे बोलताना केले.

रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे लोकप्रिय उमेद्वार ना. नारायणराव राणे साहेबांच्या निवडणूक प्रचारार्थ तुळस जिल्हा परिषद मतदारसंघाचा महायुती महिला मेळावा तुळस येथील उत्सव हॉल येथे सौ. निलमताई राणे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या दिमाखात संपन्न झाला.

यावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष श्री. मनिष दळवी, भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री महेश सारंग, भाजपा महिला जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगांवकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्षा ॲड. सौ. सुषमा खानोलकर, माजी जि.प. अध्यक्षा सौ. सुमेधा पाताडे, माजी जि. प. सभापती सौ. अस्मिता बांदेकर, सौ. मेघा गांगण, भाजपा तालुकाध्यक्ष श्री. सुहास गवंडळकर, राष्ट्रवादी वेंगुर्ला तालुका अध्यक्ष संदिप पेडणेकर, भाजपा महिला तालुकाध्यक्षा सौ. सुजाता पडवळ, माजी वेंगुर्ला पं.स. सभापती सौ. सारिका काळसेकर, तुळस सरपंच सौ.रश्मी परब, मातोंड सरपंच सौ. मयुरी वडाचेपाटकर, पाल सरपंच सौ. कावेरी गावडे, होडावडा माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य सौ. अनन्या धावडे, तुळस भाजपा महिला अध्यक्षा सौ.श्रध्दा गोरे, वजराठ भाजपा महिला अध्यक्षा सौ.जान्हवी कांदे, पाल भाजपा महिला अध्यक्षा तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सौ स्नेहा पालकर, आजगाव सरपंच तथा सावंतवाडी शिवसेना महिला प्रमुख सौ. यशस्री सौदागर , सौ. सुवर्णा झांट्ये आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्रथम सौ निलमताई राणे यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला, तुळस जिल्हा परिषद मतदारसंघाच्या वतीने मा. सौ. निलमताईंचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी माजी जि.प. अध्यक्षा सौ. सुमेधा पाताडे, श्री. मनिष दळवी यांनी ही मार्गर्शन केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणाच्या सुरुवातीलाच सौ. निलम ताईंनी कामाचे दिवस असतानाही एवढ्या मोठ्या संख्येने महिला उपस्थित राहिल्याबद्दल उपस्थित महिलांना आणि मनिष दळवी यांना धन्यवाद दिले. तसेच राणे साहेब जशी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात इंजिनिअरींग कॉलेज, मेडिकल कॉलेज, पशु वैद्यकीय कॉलेज, महिला उद्योग भवन आदी सेवा सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून देत आहेत याचं सेवा रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्यात वृध्दिंगत करण्यासाठी आणि मोदिजींचे हात बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत, असे सांगून साथ द्या असे आवाहन केले.

 

हा मेळावा यशस्वी करण्यासाठी भाजपा तालुकाध्यक्ष श्री. सुहास गवंडळकर, सुपर वारीयर्स विजय रेडकर, राजबा सावंत, नितीन चव्हाण, ज्ञानेश्वर केळजी, बाबूसो सावंत, सोमा मेस्त्री, कमलेश गावडे, शक्ती केंद्र प्रमुख संतोष शेटकर, सर्व सरपंच, उपसरपंच, श्री .रामू परब, श्री. विनय गोरे, जयवंत तुळसकर, सचिन नाईक, दादा गावडे, शेखर तुळसकर, पप्या परब, बंड्या होडावडेकर, सुधीर भगत, बुथ अध्यक्ष सुहास सावंत, रुपेश कोचरेकर, संदिप बेहेरे, रत्नाकर शिरोडकर, चंद्रे परब, विकू साळगावकर, संतोष दळवी, आनंद नाईक, प्रसाद परब,शरद पार्सेकर, राजेश करंगुटकर, निशा सावंत, ख्रिस्तालीन डिसोजा, प्रसाद दळवी, विजय होडावडेकर, रमेश राणे, वसंत परब, गोवेकर, राहूल प्रभू, गायेश परब, महेश वडाचे पाटकर, शेखर परब, प्रसाद नाईक, गणेश राउळ,प्रदिप मुळीक, सौ.अपर्णा गावडे, सौ. कल्पना घारे, सौ. सुवर्णा पवार, सौ. मनाली चुडजी, सौ. दामिनी बर्डे, सौ. शितल नाईक, सौ. बेहेरे, आदींनी खुप मेहनत घेतली. महिला मेळाव्यास तुळस जिल्हा परिषद मतदारसंघातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, मेळाव्याचे सुत्रसंचलन श्री.विजय रेडकर यांनी केले तर आभार सौ. सुजाता पडवळ यांनी मानले.