कोकण रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक अखेर पूर्वपदावर

खेड (प्रतिनिधी)
कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांचे विकेंडला बिघडलेले वेळापत्रक अखेर  पूर्वपदावर आल्याने प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला. ३ गाड्यांचा अपवाद वळगता सर्व रेल्वेगाड्या निर्धारित वेळेत मार्गस्थ झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला.
उधना-मंगळूर स्पेशल- २ तास २० मिनिटे तर पुणे-एर्नाकुलम एक्सप्रेस २ तास १५ मिनिटे उशिराने मार्गस्थ झाली. एर्नाकुलम-एलटीटी दुरांतो एक्सप्रेस १ तास उशिराने धावली, हा अपवाद वगळता अन्य रेल्वेगाड्या नियोजित वेळेत धावल्याने प्रवाशांची रखडपट्टीच्या प्रवासातून काही अंशी सुटका झाली.