वेंगुर्ला | प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा जैन परिवार आयोजित नुकत्याच जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये वेंगुर्ला न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा विद्यालयाची आठवीची विद्यार्थीनी कुमारी रिया प्रशांत वराडकर हिने प्रथम क्रमांक पटकावला तर तृतीय क्रमांक कु.आर्य संदेश मोचेमाडकर या नववीच्या विद्यार्थी पटकावत जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये उज्वल यश संपादन केले भगवान महावीरांचा त्यांच्या विचारांचा परिचय मुलांना व्हावा आणि त्यांनी सांगितलेली तत्व सर्वसामान्य समाजात किंबहुना मुलांमध्ये पोहोचावी म्हणून मुलांच्या वैचारिकतेला वाव देण्यासाठी सदर जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन जैन परिवारने केले होते.
या स्पर्धेत जिल्ह्यांत प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेल्या न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा विद्यालयाची कु.रिया वराडकर हिने जैन तिर्थस्थाने आणि तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या आर्य मोचेमाडकर याने जैन धर्माची शिकवण या विषयावर निबंध लेखन केले होते या दोन्ही यशस्वी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धे साठी या यशस्वी विद्यार्थ्यांना अजित केरकर आणि सौ.भिसे मॅडम उपक्रमशील अध्यापक वैभव खानोलकर आणि तिच्या पालकांनी विशेष मार्गदर्शन केले. या जिल्ह्यास्तरीय स्पर्धेतील यशाबद्दल न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा हायस्कूलचे मुख्याध्यापक उमेश वाळवेकर , संस्था अध्यक्ष विरेंद्र आडारकर कामत, सचिव तथा जेष्ठ रांगोळीकार रमेश नरसुले, उपाध्यक्ष रमेश पिगुळकर,निलेश मांजरेकर आणि सर्व पदाधिकारी यांनी या निबंध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी रिया वराडकर आणि आर्य संदेश मोचेमाडकर तसेच यांना मार्गदर्शक शिक्षक सौ भिसे मॅडम , खानोलकर सर आणि लिपिक श्री अजित केरकर आणि यशस्वी विद्यार्थ्यांच्या पालकांचे हि विशेष अभिनंदन केले आहे.
जिल्हा स्तरावर संपन्न झालेल्या निबंध स्पर्धेत घवघवीत यश संपादन करून यश पटकावणाऱ्या या न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा प्रशालेचे आणि या दोन्ही विद्यार्थ्यांनी चे हि सर्वत्र कौतुक होत आहे











