शुक्रवारी २६ एप्रिल रोजी राजीव गांधी क्रिडांगणावर जाहिर प्रचार सभा
राजापूर (प्रतिनिधी): रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांच्या प्रचारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस शुक्रवारी राजापुरात येत आहेत. शुक्रवारी दुपारी ३ वाजता शहरातील वरचीपेठ येथील राजीव गांधी क्रिडांगणावर ही जाहिर प्रचार सभा होणार आहे. तशी माहिती भाजपाचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे प्रमुख माजी आमदार प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांच्या प्रचाराची जोरदार रणधुमाळी सध्या सुरू आहे. मतदार संघात महायुतीचे नेते व कार्यकर्ते जोमाने प्रचार आहेत. आता खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महायुतीचे उमेदवार ना. राणे यांच्या प्रचारासाठी राजापुरात येत आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी फडणवीस यांची ही जाहिर प्रचार सभा होणार आहे.
शुक्रवारी २६ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता ना. फडणवीस यांचे राजापूरात आगमन होणार असून ते राजीव गांधी क्रिडांगणावर होणाऱ्या महायुतीच्या प्रचार सभेत मार्गदर्शन करणार असल्याचे जठार यांनी सांगितले. याप्रसंगी महायुतीचे उमेदवार ना. नारायण राणे, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, उद्योगमंत्री उदय सामंत, शिवसेना नेते किरण सामंत, मनसेचे अविनाश सौंदळकर, आरपीआयचे राजन बेतकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शिवसेना जिल्हा प्रमुख राहुल पंडीत आदींसह रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील महायुतीचे सर्व पदाधिकारी व मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.
या सभेची तयारी भाजपाकडून हाती घेण्यात आली असून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोठया संख्येने या सभेला उपस्थित रहावे असे आवाहन जठार यांनी केले आहे.
गुरूवारच्या आडिवरे व पाचल येथील सभा रद्द : खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महायुतीचे उमेदवार ना. राणे यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी २६ एप्रिल रोजी राजापुरात येत आहेत. त्यामुळे महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांच्या प्रचारासाठी गुरूवारी २५ एप्रिल रोजी आडिवरे व पाचल अशा दोन ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या प्रचार रद्द करण्यात आल्यची माहिती प्रमोद जठार यांनी दिली.
या पत्रकार परिषदेला भाजपा तालुकाध्यक्ष सुरेश गुरव, महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. सुयोगा जठार, स्वप्नील गोठणकर, अरविंद लांजेकर उपस्थीत होते.











