तीन ग्रामपंचायतीच्या सरपंच, सदस्य व पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश
लांजा -: संतोष कोत्रे
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कार्य कुशल नेतृत्वाने लांजा तालुका शिवसेना उबाठा गटाला जोरदार धक्का बसला आहे. तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या सरपंच, सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी आज बुधवारी २४ एप्रिल रोजी दुपारी रत्नागिरी येथे भाजपा पक्षात जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे मंत्री रवींद्र चव्हाण तसेच नेते आणि महासचिव विनोद तावडे व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी स्वागत केले.
भाजपाचे नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे मंगळवारी लांजा दौर्यावर आले होते. या एकाच दौऱ्यात त्यांनी शिवसेना उबाठा गटाला जोरदार धक्का दिला आहे .आज बुधवारी रत्नागिरी येथे दुपारी स्वयंवर मंगल कार्यालयात झालेल्या जाहीर कार्यक्रमात शिवसेना उबाठा गटाचे वाकेड ग्रामपंचायत सदस्या लक्ष्मी चंद्रकांत बाराम आणि स्नेहल पांचाळ, वाघणगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच रिद्धी रुपेश जवरे आणि उपसरपंच अरुण शांताराम जाधव तसेच गवाणेचे ग्रामपंचायत सदस्य दीपक दाभोळकर, प्रशांत कोटकर राधिका डोंगरे ,माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील दाभोळकर, युवासेना उपतालुका अधिकारी धर्मेंद्र दाभोळकर, महिला शाखा संघटक तनवी दाभोळकर, गटप्रमुख विश्वनाथ शिंदे, शाखाप्रमुख विलास दाभोळकर तसेच , सुनील दाभोळकर अजय दाभोळकर, तानाजी दाभोळकर ,रवींद्र दाभोळकर आदी पदाधिकाऱ्यांनी भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला या सर्वांचे रवींद्र चव्हाण, नेते विनोद तावडे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पक्षाची शाल घालून स्वागत केले.
या सर्व पक्षप्रवेशासाठी भाजपाचे युवा मोर्चाचे लोकसभा संयोजक आणि नगरसेवक संजय यादव ,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष महेश उर्फ मुन्ना खामकर, तालुका अध्यक्ष चंद्रकांत मांडवकर ,जिल्हा सरचिटणीस हेमंत शेट्ये त्याचप्रमाणे चंद्रकांत भोवड, बुवा राणे, ओमकार आंब्रे, मंगेश जाधव यांनी मेहनत घेतली.











