कॉग्रेस-जनतादल राडा अन गोळीबार…!

संतोष वायंगणकर

राजापूर लोकसभा मतदारसंघाची १९८९ ची निवडणूक कोकणात खरं तर विशेष चर्चेत आली. त्यावेळी जनता पक्षातर्फे प्रा.मधु दंडवते आणि कॉग्रेसतर्फे शिवरामराजे भोसले अशी निवडणूक लढत होत होती. १९९९ मध्ये प्रा.मधु दंडवते यांना २ लाख ४१ हजार ६९४ मते मिळाली होती. मात्र, ४२००० मतांनी कँग्रेसच्या शिवरामराजे भोसले यांचा पराभव झाला होत. कँग्रेसपक्ष आणि जनता दल यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अनेकवेळा आमनेसामने येण्याचे प्रकार घडायचे. हमरीतुमरीवर येण्याच्या घटनाही घडत होत्या. मात्र, तरीही निवडणूक वातावरण तेव्हाही असायचं. कार्यकर्ते स्वत:ची मिठभाकरी घेऊन प्रचारकार्यात असण्याचा तो काळ होता. पुढच्या काही वर्षात कार्यकर्त्यांचे स्वरूपच बदललं तो सतत बदलत गेला. दहशतवाद, राडासंस्कृती यावर निवडणूक काळात अनेक पक्षांचे पुढारी म्हणवणारे वेगवेगळी वक्तव्ये करत असतात. परंतु या सर्वंामध्ये एका लोकसभा निवडणुकीत एक मोठा राडा झाला.

हा राडा जनता पक्ष आणि कॉग्रेस पक्ष यामध्ये झालेला. सावंतवाडीतील गांधी चौकातील क्षुल्लक असलेलं प्रकरण वाढत गेलं आणि ते प्रकरण एवढ वाढलं की दगडफेक, कार्यकर्त्यांना मारहाण झाली. पोिलसांचा हस्तक्षेप झाला तरीही प्रकरण शांत होण्याचे नाव घेईना. निवडणुक काळात एखादा क्षुल्लक असणारा वाटणारा वाद कसं स्वरूप धारण करेल हे खरंतर कुणालाच सांगता येणारे नाही. आणि कोणी ठरवलं तरीही ठरवता न येणारे असते. तसच काहीसं सावंतवाडीतील गांधीचौकातील त्या राड्यामध्ये झालं. माजी आमदार पुष्पसेन सावंत तेव्हा फारच आक्रमक झाले. पोलीस आणि माजी आमदार पुष्पसेन सावंत यांच्यामध्येही बरीच झटापट झाली.

त्याच िदवशी सावंतवाडीतील माठेवाड्याची प्रसिध्द जत्रा होती. सावंतवाडीतील त्या राजकीय राड्याचा परिणाम माठेवाड्यातील जत्रेवरही झाला होता. ज्या जत्रेला हजारो भािवकांची उपस्थिती असायची तिथे कोणीही िफरकले देखील नाही. त्याची आठवण सांगताना समाजवादी विचाराचे ज्येष्ठ कार्यकर्ते पत्रकार रमेश बोंद्रे म्हणाले की, माठेवाड्याची जत्रेला त्यािदवशी चिटपाखरूही फिरकलं नाही. इतका सन्नाटा सावंतवाडीत पसरला होता. सावंतवाडी, गांधीनगर चौकातील कॉग्रेसच्या जनता पक्षातील झालेल्या वादात त्यावेळचे सावंतवाडी पोलीस स्थानकाचे निरीक्षक विलास भोसले यांची भूिमका वादात सापडली होती.

कॉंग्रेस -जनता दलाचे कार्यकर्ते आमनेसामने येऊन दगडफेक आणि मारहाणीचे प्रकार जोरदारपणे सुरू झाले होते. यामुळे तत्कालीन पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी सहकारी पोलसीनांनी लाठीचार्जचे आदेश दिले. पोलीसांनी लाठीचार्जचे आदेश िमळताच दगडफेक, हाणामारी करणाऱ्या शेकडोंच्या जमावाला पांगवण्यासाठी अक्षरश: बदडून काढले.

त्यात माजी आमदार पुष्पसेन सावंत होते. गांधीनगर चौकातील या घटनेला एक ट्रकचालक- मालक संघाच्या कार्यकर्त्यांच्या आंदोलनाची एक किनार होती.त्या आंदोलनात पुष्पसेन सावंत यांनी पोलीस निरिक्षक विलास भोसले यांच्यावर काहीआरोप केले होते.या आरोपामुळे सहाजिकच पोलीस निरिक्षक विलास भोसले बिथरले होते.पोलीस निरिक्षक विलास भोसले हे डॅशिंग अधिकारी म्हणून ओळखले जायचे.त्यांनी गांधी चाैकातील परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने हवेत गोळीबार केला.

या हवेतील गोळीबाराने कार्यकर्ते पांगले परंतु पळापळीत अनेक कार्यकर्ते जखमी झाले.तेव्हा राज्यात कॉंग्रेस सत्तेवर होती. जनतादलाकडून कॉंग्रेसला आरोपीच्या पिंजऱ्यात उभ करण्यात आलं.या दुसऱ्या घटनेनंतर दुसऱ्याचदिवशी वृत्तपत्रात या कँग्रेस जनतादलातील हाणामारी आणि पोलीस गोळीबाराची ठळकपणे बातम्या आल्या होत्या तेव्हा खरतर कॉंग्रेसचे शिवरामराजे भोसले आणि जनतादलाचे प्रा.मधु दंडवते यांच्यामध्ये चुरशीची लढत होईल असे वातावरण तेव्हा होते.

सावंतवाडी गांधी चाैकातील त्या पोलीसी गोळीबारांच्या घटनेने वातावरण पूर्णपणे बदलले आणि शिवमराजे भोसले यांना पराभव पत्करावा लागला.तेव्हा शिवमराजे भोसले विजयी झाले असते अशी कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या तेव्हा प्रतिक्रीया होत्या.अर्थात राजकारणाला जरतरला काहीच अर्थ नसतो.या अशा निवडणूक काळातील घटनांचा आपणाला मागोवा घ्यायचाच आहे.