महाराष्ट्रात दुसऱया टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या

हाराष्ट्रात दुसऱया टप्प्यातील आठ लोकसभा जागांसाठीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या. या जागांसाठी शुक्रवार, 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. दुसऱया टप्प्यात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम, हिंगोली, नांदेड आणि परभणी लोकसभा मतदारसंघांत मतदान होणार आहे.

मतदान संपण्यापूर्वी 48 तासांमध्ये सार्वजनिक सभा, लाऊडस्पीकर आणि मिरवणुकांवर बंदी असेल. दुसऱया टप्प्यात सुमारे दीड कोटी मतदार 204 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत.