आपेडे फाटा नजीक अशोका कंपनीच्या सीएनजी पंपाजवळ वणवा

खेड नपाच्या अग्निशामक दलाला आग नियंत्रणात आणण्यात यश
खेड (प्रतिनिधी)
मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आपेडे येथे  अशोका सीएनजी पेट्रोलपंपा जवळ वणवा लागला. ही माहीती खेड पालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहचून आग नियंत्रणात आणली.
खेड पालिकेचे अग्निशमन दलालाच्या कक्षात शुक्रवारी सायंकाळी ३.३० वाजण्याच्या सुमारास दूरध्वनी वरून अपेडे फाटा भागात वणवा लागल्याची माहिती मिळाली. तातडीने पथक घटनास्थळी पोहोचले. वणव्यावर पाण्याच्या फवा-याचा मारा करीत आग नियंत्रण आणण्याचा त्याने प्रयत्न केला. या भागात सीएनजी पंप असल्याने वणव्यावर नियंत्रण मिळवत त्या ठिकाणी मोठी दुर्घटना टाळण्याचे काम अग्निशमन दलाने केले.