चिपळुणात उद्या महायुती उमेदवार ना. नारायण राणे यांची प्रचार सभा

चिपळूण (प्रतिनिधी): रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांच्या प्रचारार्थ सोमवार दि. २९ रोजी सायंकाळी ४ वाजता शहरांतील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासमोरील चौपाटी मैदान येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिपळूण तालुक्यात महायुती व महाविकास आघाडीकडून प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सध्या सर्वच उमेदवारांच्या समर्थकांनी, पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ‘डोअर टू डोअर’ प्रचारावर भर दिला असून ठिकठिकाणी प्रचार सभा, बैठका, प्रचार फेरी यांचे आयोजन केले जात आहे.

 

 

महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांच्या प्रचारार्थही घटक पक्षांनी आपली कंबर कसली आहे. शहरात त्यांच्या प्रचारार्थ दि. २९ रोजी सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

 

या प्रचार सभेला राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत, आमदार शेखर निकम, शिवसेना शिंदे गटाचे उपनेते व माजी आमदार सदानंद चव्हाण, भाजप लोकसभा प्रभारी अतुल काळसेकर, मनसेचे नेते वैभव खेडेकर, आरपीआय आठवले गटाचे नेते दादा मर्चडे आदी उपस्थित राहाणार आहेत. तरी या प्रचार सभेला महायुतीतील घटक पक्षांतील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महायुतीचे समन्वयक रामदार राणे यांनी केले आहे.