प्रांताधिकाऱ्यांकडे निवेदन, आंदोलनाचा इशारा चिपळूण (प्रतिनिधी) : शिवाजीनगर बसस्थानकजवळ एसटी महामंडळाच्या जागेत उभारण्यात येणाऱ्या सीएनजी पंपामुळे परिसरातील नागरिकांचे जीवन त्रासदायक झाले आहे. या परिसरात सुमारे ५०० लोक राहतात. धुर, आवाज व वाहतूक समस्यांमुळे रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तर रावतळे जवळ हायवेवर असलेल्या पंपात सीएनजीसाठी हायवेवरच गाड्यांची लाईन असल्याने वाहनचालकांना नाहक त्रास होत आहे.
उपलब्ध माहितीनुसार, शिवाजीनगर येथील जागा पंधरा वर्षांसाठी लीजवर दिली गेली असून मागील पाच वर्षांपासून ही जागा सीएनजी पंपासाठी वापरली जात आहे. सुरुवातीला बसगाड्यांना गॅस भरण्यासाठी जागा देण्यात आली होती, मात्र आता खाजगी व्यक्तीकडून चालवण्यात येणाऱ्या पंपामुळे नागरिकांना गंभीर त्रास होत आहे. परिसरातील नागरिकांनी प्रांताधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले असून, अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही, असा आरोप केला आहे. नागरिकांनी स्पष्ट सांगितले आहे की, कारवाई न झाल्यास ते प्रांत कार्यालयाच्या समोर आंदोलन करण्यास तयार आहेत. १५ ऑगस्टला उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र, प्रांताधिकाऱ्यांच्या मध्यस्थीमुळे तो थांबवावा लागला. नागरिकांचे म्हणणे आहे की, एसटी महामंडळाकडून जागा खाजगी व्यक्तीस दिल्यामुळे आणि सीएनजी पंप उभारल्यामुळे परिसरात वाहतूक, धुर, आवाज आणि सुरक्षिततेसंदर्भातील समस्या प्रचंड वाढल्या आहेत. प्रशासनाकडून तातडीने कारवाई होण्याची अपेक्षा येथील रहिवासी करत आहेत.
प्रांताधिकाऱ्यांकडे निवेदन, आंदोलनाचा इशारा
चिपळूण (प्रतिनिधी) : शिवाजीनगर बसस्थानकजवळ एसटी महामंडळाच्या जागेत उभारण्यात येणाऱ्या सीएनजी पंपामुळे परिसरातील नागरिकांचे जीवन त्रासदायक झाले आहे. या परिसरात सुमारे ५०० लोक राहतात. धुर, आवाज व वाहतूक समस्यांमुळे रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तर रावतळे जवळ हायवेवर असलेल्या पंपात सीएनजीसाठी हायवेवरच गाड्यांची लाईन असल्याने वाहनचालकांना नाहक त्रास होत आहे.