पणजी : प्रतिनिधी
गोव्याच्या दाबोळी व मोपा विमानतळावर बॉम्ब असल्याचा ई-मेल विमानतळ प्राधिकरणाला प्राप्त झाल्याने गोव्यात एकच खळबळ उडाली. सर्व सुरक्षा यंत्रणांनी तातडीने दोन्ही विमानतळाची कडक तपासणी केली. त्यानंतर बॉम्ब असल्याची अफवा असल्याचे स्पष्ट झाले. सर्व प्रवासी विमानांची वाहतूक विनावलंब सुरू होती, अशी माहिती मोपा विमानतळ प्राधिकरणने दिली.
सोमवारी दुपारी दक्षिण गोव्यातील दाबोली व उत्तर गोव्यातील मोपा विमानतळावर बॉम्ब असल्याचा ई-मेल विमानतळ प्राधिकरणाला मिळाला. त्यामुळे दोन्ही विमानतळांवर एकच खळबळ उडाली. सुरक्षा यंत्रणांनी तातडीने विमानतळाचा ताबा घेतला. परिसराची कडक तपासणी करण्यात आली. मात्र, कोणतीही संशयास्पद बाब आढळून आली नाही. त्यामुळे दोन्ही विमानतळावरील प्रवासी वाहतूक विना विलंब सुरू होती अशी माहिती संचालक धनंजय राव यांनी दिली.












