राणे साहेबांना मालवण शहरातून मोठे मताधिक्य निश्चित !

 

माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी व्यक्त केला ठाम विश्वास : प्रचारा दरम्यान जनतेचा मिळतोय उत्स्फूर्त पाठिंबा

अमित खोत | मालवण: भाजप महायुतीच्या माध्यमातून मालवण शहरात प्रचार करत असताना जनतेतून मिळणारा प्रतिसाद पाहता राणे साहेबांना निश्चितच मोठे मताधिक्य मिळेल. असा ठाम विश्वास माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी व्यक्त केला आहे.

मालवण शहरात भाजप महायुती पदाधिकारी यांच्या वतीने नियोजनबद्ध प्रचार सूरू असून प्रत्येकजण स्वतः उमेदवार आहे या भावानेतून प्रचार यत्रणेत सहभागी आहे. मालवण शहरात बुथ निहाय बैठका पुर्ण झाल्या असून घरोघर प्रचार सूरू आहे.

माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांच्या नेतृत्वात प्रभाग 5 वार्ड 9 व 10 या ठिकाणी घरोघर प्रचार सूरू असून जनतेचा चांगला प्रतिसाद व पाठिंबा राणे साहेबांना असल्याचा विश्वास जनताच व्यक्त करत आहे. जनतेचा प्रतिसाद पाहता बुथ क्रमांक 103 व 104 या ठिकाणी 75 टक्के पेक्षा जास्त मतदान राणे साहेबांना होईल. मालवण शहरांत सर्वच ठिकाणी राणे साहेब आघाडीवर राहतील. यापूर्वी राणे साहेब, निलेश राणे साहेब यांच्या निवडणुकीत मताधिक्यात आघाडीवर असलेले मालवण शहर त्या वेळ पेक्षा मोठे मताधिक्य देईल. असा विश्वास सुदेश आचरेकर यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी प्रचार दरम्यान बाळू तारी, बुथ अध्यक्ष आप्पा मोरजकर, विनायक मोरजकर, अभय कदम, राजु वाघ, संतोष पराडकर, पराडकर सर, नितेश पेडणेकर, रोहित खडपकर, विशाल आचरेकर, यशवंत मेथर यांसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

शहरासाठी मोठा विकासनिधी

केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हण, भाजप नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून मोठा विकासनिधी मालवण शहराला प्राप्त झाला. यापुढेही ही विकासाची गंगा अविरत सुरु राहील. गतिमान विकासासाठी राणे साहेबांना मोठे मताधिक्य जनतेच्या आशीर्वादातुन मिळणार. असे सुदेश आचरेकर यांनी सांगितले.

विरोधकांवर हल्लाबोल

खा. राऊत, आ. नाईक यांचा येथील जनतेशी कोणताही संपर्कच नाही. विकासकामे करण्यात ही मंडळी अपयशी ठरली. त्यांचा कार्यकाळ निष्क्रिय राहिला. त्यामुळे विकासाचे व्हिजन घेऊन देश प्रगतीपथावर नेत असलेल्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी जनता ठामपणे उभी आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातून राणे साहेब अडीज लाखाच्या मताधिक्याने विजयी होतील. असा ठाम विश्वास सुदेश आचरेकर यांनी व्यक्त केला.