ना.नारायण राणे यांच्या प्रचारार्थ नितीन गडकरी यांची ५ मे रोजी सावंतवाडीत सभा

भाजपा सावंतवाडी विधानसभा प्रमुख माजी आमदार राजन तेथे यांची माहिती

सावंतवाडी । प्रतिनिधी :भाजप महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ कणकवली येथे दि.४ मे रोजी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची तर दि.५ मे रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सावंतवाडी मध्ये सभा होणार असल्याची माहिती सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे समन्वयक माजी आमदार राजन तेली यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

राजन तेली म्हणाले, निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्याचा विजय निश्चित असून सहाही विधानसभा मतदारसंघातून मोठ्या फरकाचे मताधिक्य मिळवून देण्यासाठी भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, मनसे व रामदास आठवले आरपीआय च्या माध्यमातून कार्यकर्ते व पदाधिकारी प्रयत्न करत आहेत.

केंद्र सरकारच्या ५४ योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य जनतेसाठी आणल्यात त्या आम्ही जनतेसमोर घेऊन जात आहोत. कणखर नेतृत्व म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगभरात प्रसिद्ध आहेत त्यामुळे मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी जनता देखील आतुरलेली आहे असे त्यांनी सांगितले .

आम्ही जनतेसमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेली कामगिरी घेऊन जात आहोत आणि चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे हे त्यांनी सांगितले. ऑनलाइन अर्थात डिजिटल पद्धतीने चलनात पैसा येऊ लागल्याने अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर आली आहे ती पुढील काळात तीन नंबर वर आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम होईल.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बेरोजगारीवर पर्याय शोधले असून त्यांनी प्रकल्प साकारण्याचा निश्चय केला आहे. सी वर्ल्ड प्रकल्प झाला असता तर आज मोठ्या प्रमाणात बेरोजगारी दूर झाली असती पण याच खासदार विनायक राऊत आणि ठाकरे यांच्या आमदारांनी त्याला विरोध केला. रिफायनरी ला देखील विरोध राहिल्याने प्रकल्प होऊ शकले नाहीत.

तेली म्हणाले, आडाळी एमआयडीसी, दोडामार्ग तालुका निर्मिती ही नारायण राणे यांनी केली आहे या ठिकाणी देखील रोजगार आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत पुढील काळात जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासोबतच रोजगाराच्या प्रश्नावर नारायण राणे यांचे मॉडेल तयार आहे ते निश्चित काम करतील.

सर्वात महत्त्वाचा योग म्हणजे प्रथमच लोकसभा निवडणुकीत कमळ चिन्हाला मतदान करण्याची संधी मिळणार असल्याने सहाही विधानसभा मतदारसंघातून लोकसभा उमेदवार नारायण राणे यांच्या विजयाची गॅरंटी महायुती देत आहे, असे राजन तेली यांनी बोलताना सांगितले.