बिळवस सातेरी जलमंदिर कलश वर्धापनदिन ७ मे रोजी!

मसुरे | झुंजार पेडणेकर

मसुरे गावची मुळमाया आदिदेवता आदीशक्ती श्री देवी सातेरी देवालय मंदिराच्या गाभाऱ्यावरील कलश वर्धापन दिन सोहळा ७ मे रोजी संपन्न होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स. ८ ते ९ – गणेश पुजन व पुरोहितांच्या मंत्रघोषात कलश पुजन,
९ ते ११ – धार्मिक विधी,
दुपारी १ ते ३ महाप्रसाद,
३ ते ५ श्री सत्यनारायणाची महापुजा, ५ ते ७ महाआरती, प्रार्थना, तिर्थप्रसाद, ७ ते १० – स्थानिक ग्रामस्थांची सुस्वर भजने, रात्रौ १०.०० वा. जय हनुमान पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ आरोस-दांडेली यांचा दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. उपस्थितीचे आवाहन बिळवस ग्रामस्थ व सातेरी देवी जलमंदिर ट्रस्ट बिळवस यांनी केले आहे.