आज जे दिवस दिसताहेत ते सर्व दादांमुळे …त्यांचे आभार मानण्यासाठी आमच्याकडे शब्द नाहीत!
वरवडेतील अब्दुला खानचा परिवार सांगतो; राणे साहेब आमच्यासाठी देवासमान !
किशोर राणे (वरवडे ) :
जे काय आम्ही आहोत ते दादांमुळे! ‘नात का न गोत का…’पण दादा आमच्यासाठी ठाम उभे राहीले..अजानता वयापासून आम्ही आमच्या पायावर सक्षम होईपर्यंत त्यांच्या मदतीचा ओघ कायम होता. संकटात तत्कालीन मदत करणारे अनेकजण असतात,कुटुंबातले ही काही काळ पुढे होतात पण दिर्घकाळ पाठीशी ठाम उभे राहणारे म्हणजे आमचे दादा…राणे साहेब! ते नसते तर आम्ही कुठे असतो याची कल्पनाही करवत नाहीय..आज जे दिवस दिसताहेत ते सर्व दादांमुळे …त्यांचे आभार मानण्यासाठी आमच्याकडे शब्द नाहीत…अश्रुभरल्या डोळ्यांनी वरवडेतील मोसिन अब्दुला खान सांगत होता…एसटी स्टॅन्डवर हमाली करणाऱ्या अब्दुला खानचे अपघाती निधन झाल्यावर उघड्यावर पडललेला त्याचा सहा मुलांच्या संसाराला ना.नारायण राणे यांनी खंबीर आधार दिला.अब्दुला खान सारख्या अनेक परिवारांना ना.नारायण राणे यांनी सर्वतोपरी मदत केलीय…निस्वार्थ भावनेतून…अनेकांचे ते आधारवड झालेत…अनेकांचे दिपस्तंभ..अनेकांना त्यांनी मार्ग दाखवलाय..अगदी व्रतस्थपणे ,अव्याहत हे काम सुरु आहे!
सन १९९९ कालाष्टमीचा दिवस… दहीहंडीचा उत्साह गोविंदांच्या अंगात संचारला होता. सर्वत्र गोविंदांचा जयघोष सुरू असताना कणकवली एसटी स्टँड समोरही उंच दहीहंडी बांधून फोडण्याचा गोविंदाचा उत्साह कमालीचा वाढला होता. दुपारची वेळ पावसाची रिमझिम होतीच… पावसाळी वातावरणात एसटी स्टँड समोर दहीहंडी बांधायचे ठरले. एसटी स्टँडवर हमाल असलेला अब्दुल्ला खान पुढे झेपावला, वरवडेचा हा अब्दुल्ला खान मुसलमान असला तरी गोविंदांच्या उत्साहात तो सर्वात पुढे… दहीहंडी बांधताना विजेच्या पोलावरच प्रवाहित तारांना त्याचा हात लागला आणि क्षणातच तो जमिनीवर कोसळला…सर्वजण मदतीला धावले.पण रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांनी देह ठेवला होता. सर्वांचाच उत्साह मावळला… कणकवली शोकात बुडाली. त्यावर्षी शहरातील एकही दहीहंडी फुटली नाही.
अब्दुलाच्या ६ मुलांचा परिवार वाऱ्यावर आला. अब्दुलाच्या २ पत्नी.. पहिलीशी तलाक झाला ती मुंबईला गेली…पण तीची तीन मुले अब्दुलाकडेच होती. तर दुसऱ्या पत्नीपासून तीन मुले झालेली…अब्दुला गेला तेव्हा सर्वात मोठा मुलगा मोसीन. त्याचे वय होते वय ८ वर्ष.. सर्वात लहान अहमद ७ ते ८ महिन्याचा…यांच्यामध्ये विलायद, फिरोज, मरियाम अन इक्बाल या सर्वच मुलांच्या पालन पोषणाचे काय? खान परिवारासमोर मोठा प्रश्न होता. अब्दुलाचा भाऊ आब्बास खान कणकवली बाजारात फिरुन भाजी विक्री करायचे, त्यांची मिळकत ती काय? यावर त्यांचा संसार अन पाठोपाठ भावाच्या परिवाराचा भार…सारा खान परिवारच चिंतातुर होता.
या दुःखद घटनेची माहिती ना.नारायण राणे यांना मिळाली. त्यांना फारच दु:ख झाले. अब्दुलाच्या परिवाराच्या संगोपनाची त्यांनी जबाबदारी स्वीकारली. मुले सज्ञान होईपर्यंत दरमहा आर्थीक मदत त्यांनी सुरु केली. या मुलांचे काका अब्बास हे दरमहिन्याला ही मदत घेत असत… यावेळी अब्दुलाच्या मुलांना आमच्याकडे पाठवा…आम्ही त्यांना शिकवतो. उभे करतो असे अनेकदा त्यांनी अब्बासला सांगीतलेही मात्र मुलांचे आजोबा याकुब खान यांनी नातवंडांना आमच्याकडेच राहुद्या असा आग्रह धरला…
सामाजिक प्रातांतील कुणी असो वा राजकारणातील…तत्कालीन मदत कुणीही करते,मात्र सर्वसामान्यांना दिर्घकाळ मदतीचा हात खंबीरपणे असायला हवा असतो. ना.नारायण राणे आणी परिवाराने हा वसा कसोशीने जपला आहे. अनेकांचे संसार उभे करुन देतानाच अनेकांना अनेक गोष्टीत ते सतत मदत करत असतात.नारायण राणे हे व्यक्तिमत्त्वच असे आहे, जे जात धर्म पंथाच्या पलिकडे जाऊन मानवतेचा वसा घेत झपाटुन गेले आहे. संकटे कोणतीही येऊं दे…कोणतीही उलथापालथ होऊं दे पण आपल्यावर जे जे अवलंबून आहेत त्या परिवाराची त्यांना मोठी चिंता… याच झपाट्याने अब्दुलाच्या परिवाराला महिन्याकाठी आर्थिक मदत मिळेल अशी तजवीज त्यांनी केली होती. त्यांनी दर महिन्याला ही मदत उचलावी असा नियम करून दिला होता.अगदी अलीकडेपर्यंत हा रिवाज सुरु होता…
राणे साहेबांचे दर्शन घ्यावे असे अनेक वेळा वाटते पण…

राणेसाहेंबामुळे आम्ही तरलो..अन जगलो सुध्दा! आज जे काही आहोत ते त्यांच्यामुळे असे अब्दुलाचा मोठा मुलगा मोसीन सांगतो, मोसीन म्हणतो…माझा बाप कणकवलीच्या एसटी स्टॅन्डवर हमाली करायचा…आम्हाला न कळत्या वयातच तोही सोडून गेला. त्यापुर्वी आई गेली, सावत्र आई होती ती बाप गेल्यावर दोन वर्षातच माहेरी गेली. आम्ही तिन मुले पोरकीच होतो. अधार होता तो राणे साहेबांचा…काकांनी आमचा सांभाळ केला.पण दादा नेहमीच आमची चौकशी करायचे त्यामुळे त्यांचा धाकही होताच. आम्ही थेट साहेबांकडे कधी गेलो नाही.काकाच जायचे…त्यामुळे साहेबांना भेटावे त्यांचे आशीर्वाद घ्यावेत…पायावर डोके टेकवावे असे मनापासून वाटते…पण एवढ्यामोठ्या साहेंबासमोर आपण असे कसे जायचे? ही भीती आजही वाटते. मग मनातुच आम्ही त्यांचे दर्शन घेतो.
आमचे आजोबा सांगायचे आमचे बाबा म्हणजे अब्दुल्ला दादांचे वर्गमित्र… वरवडे गावातल्या शाळेची दोस्ती … नंतर साहेब मुंबईत गेले आमचे बाबा गावीच राहिले… मात्र दादा गावी आले की बाबांही पुढे असायचे. आमच्या वाडीत बाबांचा मोठा दरारा होता तोही साहेबांच्या जीवावर… बाबा गेले पण आम्हाला दादांनी संभाळले. ते नसते तर… ह्या प्रश्नावरही भिती वाटते. दादासाहेबांनी जी मदत केली त्याबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी आमच्याकडे शब्द नाहीत.
मोसीन खान इलेक्ट्रिक क्षेत्रात निक्ष्णात आहे. वायरमनांनाही अवघड असणारी कामे तो लिलया करतो. त्याचे लग्नही झालेय…त्याला दोन मुलेही आहेत. त्याचा भाऊ विलायद हा फॅब्रीकेशनच्या व्यवसायात स्थिरावलाय..दोन्ही आनंदात आहेत. दोंघाशीही बोलताना राणे परिवाराबद्दलची कृतज्ञता प्रत्येक क्षणी दिसत होती.
मोठे साहेब, आईसाहेब …अन राणे परिवारच आमच्यासाठी देवासमान!

सात वर्षापुर्वीची गोष्ट विलायदला पोटदुखीचा प्रचंड त्रास जाणवत होता. डॉक्टरांना दाखविले निदान झाले अल्सरचे ऑपरेशन करायला हवे..ते सुध्दा तातडीने…आमच्यासमोर प्रश्न होताच? एवढा पैसा कुठुन आणायचा?? मात्र मोठ्या साहेंबांना हे कुठुनतरी समजले. काकांशी बोलून घेत त्यांनी डॉक्टरांनाही सांगीतले. त्यांनी डॉक्टरांना परस्पर बिल दिले. विलायत ठणठणीत होऊन घरी आला. चार वर्षापुर्वी पुन्हा असेच दुखणे वाढले होते. त्यावेळीही साहेबांनी अशीच मदत केली.साहेब गोरगरींबांच्या पाठिशी खंबीर उभे राहतातच… विलायद म्हणतो, मोठे साहेब, आईसाहेब …अन राणे परिवारच आमच्यासाठी देवासमान म्हणायला हवेतच… निस्वार्थ सेवा आहे त्यांची… साहेब हे साहेबच आहेत.












