कोकण रेल्वेच्या धडकेत सावंतवाडीतील इसमाचा मृत्यू

सावंतवाडी । प्रतिनिधी : कोकण रेल्वेच्या मळगाव स्थित सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकात कोकण रेल्वेच्या धडकेत सावंतवाडी शहरातील एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा इसम सायंकाळपासून सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकात फिरत होता. रात्री ८.४० च्या सुमारास गोवा येथून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कोकण कन्या एक्सप्रेसची धडक त्याला बसली या धडकेत जागीच त्याचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली असून पोलीस घटनास्थळी रवाना होणार आहेत. दरम्यान त्याच्या मृतदेह शेजारी प्लॅटफॉर्मवर त्याची टोपी तसेच चष्म्याचे कव्हर आढळून आले आहे. तो सावंतवाडी शहरातील एक प्रसिद्ध ढोलकी वादक असल्याची माहिती त्याच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.