राणे साहेबांच्या ऋणातून उताराई होण्याची संधी म्हणजे ही लोकसभा निवडणूक

मोठे मताधिक्य देऊया : भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचे आवाहन : मालवण येथे भाजपा महायुती प्रचार कार्यालय उदघाटन

मालवण | प्रतिनिधी : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून भाजपा महायुतीचे लोकप्रिय उमेदवार भाजपा नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा विजय जनतेच्या पाठिंब्यावर निश्चित झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्या सोबत रत्नागिरी जिल्ह्यातही भाजपा महायुती पदाधिकारी कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे प्रचार करत असून रत्नागिरी जिल्ह्यातूनही मोठे मताधिक्य राणे साहेबाना मिळेल. 4 जून निवडणूक निकाल नंतर विजयी सभा याच प्रचार कर्यालयात घेऊ. असा निर्धार भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी मालवण शहर येथे महायुती प्रचार कार्यालय शुभारंभ प्रसंगी व्यक्त केला.

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात राणे साहेबांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या ऋणातून उताराई होण्याची संधी म्हणजे ही निवडणूक असून मोठे मताधिक्य देतं राणे साहेबांना विजयी करूया असे आवाहनही प्रभाकर सावंत यांनी केले.

मालवण शहर भाजपा प्रचार कार्यालय उदघाटन भाजपा जेष्ठ पदाधिकारी विलास हडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, शिवसेना कुडाळ मालवण विधानसभा पदाधिकारी बबन शिंदे, तालुकाध्यक्ष राजा गावकर, उपतालुकाप्रमुख पराग खोत, मनसे उपाजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर यांसह भाजपा महायुती पदाधिकारी सुदेश आचरेकर, बाबा परब, गणेश कुशे, बाबा मोंडकर, विकी तोरसकर, राजु वराडकर, नांना साईल, बबन परुळेकर, जॉन नरोना, भाऊ सामंत, अभय कदम, विलास मुणगेकर, अजय शिंदे, माजी उपनगराध्यक्ष शर्वरी पाटकर, शहर अध्यक्ष चारू आचरेकर, ममता वराडकर, पुजा सरकारे, नाटेकर, महिमा मयेकर, दिव्या कोचरेकर, मनसे पदाधिकारी अमित इब्रामपूरकर, विल्सन गिरकर, सागर जाधव, गुरु तोडणकर, विशाल ओटवणेकर, मयूर फाटक, नितेश खडपे, नितेश पेडणेकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.