सावंतवाडी : सावंतवाडी येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक डॉ. अनंत काशीराम कोळवणकर (९०) यांचे मंगळवारी मुंबई येथे निधन झाले. डॉ. कोळवणकर हे भाईसाहेब सावंत आयुर्वेद कॉलेजच्या स्थापनेनंतर एक वर्षातच तेथे रुजू झाले होते. त्यापूर्वी ते मुंबईत पोतदार कॉलेजला प्राध्यापक होते.
ते लोअर परेल येथे खाजगी प्रॅक्टिससही करायचे. त्यांच्या मागे दोन मुलगे सचिन, शशांक, मुलगी स्वाती आदी असा परिवार आहे. डॉ. कोळवणकर हे विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. त्यांच्या तासाची घंटा कधी होत असे ते कळतच नसेल, एवढे तल्लीन होऊन ते शिकवत असत. त्यांचे अनेक विद्यार्थी आज वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत.












