मसुरे | झुंजार पेडणेकर : मसुरे मार्गाचीतड येथील श्री महागणपती मंदिराचा १८ वा वर्धापनदिन ०४ मे रोजी साजरा करण्यात येत आहे.
सकाळी ०७.३० वा. श्री महागणपती पूजा व अभिषेक, सकाळी ८.०० ते १०.०० वा. सामुदायिक अभिषेक सोहळा, सकाळी १०.०० : श्री. सत्यनारायण महापूजा,
दुपारी १२.३० वा. महाआरती, दुपारी १.०० ते ३.०० वा. महाप्रसाद,
रात्रौ. ७.३० नंतर सुश्राव्य भजने, रात्रौ ८.३० वा. नंतर ओंकार दशावतार नाटय मंडळ म्हापण-वेंगुर्ला यांचा
नागतपस्वी हा दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे.
उपस्थितीचे आवाहन
श्री महागणपती विश्वस्त मंडळ मसुरे मार्गाचीतड सर्व पदाधिकारी व सदस्य ग्रामस्थ यांनी केले आहे.








