पेंडूर जिल्हा परिषद मतदार संघाचे मागास सेल विभागप्रमुख भिवा तळगावकर यांचा भाजपात प्रवेश : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उपस्थिती
मालवण | प्रतिनिधी : खासदार विनायक राऊत यांना त्यांच्या तळगाव गावात भाजपाने धक्का दिला आहे. पेंडूर जिल्हा परिषद मतदार संघाचे मागास सेल विभागप्रमुख भिवा तातू तळगावकर यासह संतोष तळगावकर सागर तळगावकर, केशव तळगावकर, शिवराम केळूसकर, यांनी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत प्रवेश प्रवेश केला आहे.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यासह् पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.












