उपवडे येथील भाजपच्या त्या कार्यकर्त्यांनी उबाठा त प्रवेश केलाच नाही..!

आमदार वैभव नाईक यांचा खोटारडेपणा झाला उघड

उपवडे: कुडाळ तालुक्यातील उपवडे येथील भाजप कार्यकर्ते उबाठा सेनेत प्रवेश केल्याचे खोटेवृत्त प्रसिद्ध करून आमदार वैभव नाईक यांनी केलेला खोटारडेपणा आज उघड झाला. जे कार्यकर्ते उबाठा सेनेत प्रवेश केला असे दाखवण्यात आले होते त्यांनी स्वतःहून आपण भारतीय जनता पार्टी आणि नारायण राणे यांचे नेतृत्व सोडलेले नाही त्यांच्यासोबतच आहोत आणि कायम भाजप मध्येच राहणार असे सांगितले. कुडाळ चे माजी सभापती मोहन सावंत यांच्या उपस्थितीत उपवडे येते बैठक झाली या बैठकीत भाजपच्या त्या कार्यकर्त्यांनी आपण भाजपमध्येच असल्याची ग्वाही दिली.
यावेळी खालील कार्यकर्ते उपस्थित होते.प्रमोद राऊळ,दशरथ राऊळ,निलेश राऊळ,दिनेश धुरी,निवास राऊळ,उदय शेडगे, गुरूप्रसाद राऊळ गणेश शेडगे,संदिप शेडगे आदी उबाठात गेल्याची बातमी प्रसिद्ध केली होती.मात्र हे सर्व लोक हे भाजप मध्येच आहे आणि कायम राहणार आहेत.तशी ग्वाही बैठकीत दिले.

या. बैठकीत माजी सभापती मनोहर सावंत याच्या सह स्थानिक भाजप पदाधिकारी मनोज दळवी,विठ्ठल मोरजकर, यशवंत राऊळ,आनंद दळवी,अजित दळवी,अनंत दळवी,सवे॔श कदम,हरी घाडी, राजन गुरव, समीर शेडगे आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.