खेड लायन्स क्लबकडून मतदारांना पुरवली मोफत वैद्यकीय सुविधा

 

खेड(प्रतिनिधी) मंगळवारी लोकसभेसाठी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेदरम्यान शहरातील मतदान मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रांगेत उभ्या असणाऱ्या मतदारांना उष्माघाताचा त्रास झाल्यास त्यांच्या उपचारासाठी येथील लायन्स क्लब ऑफ सिटीने मोफत वैद्यकीय सेवेची उपलब्धतता करून दिली.

 

लायन्स क्लब ऑफ सिटीचे अध्यक्ष रोहन विचारे व
सहकाऱ्यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. यासाठी वैद्यकीय पथके तैनात केली.
ठिकठिकाणी पाहणीही केली. या उपक्रमात लायन्स क्लबचे अध्यक्ष रोहन विचारे, सचिव सुरेश चिकणे, माजी अध्यक्ष डॉ. विक्रांत पाटील, निनाद गांधी, शैलेश धारिया, सामाजिक कार्यकर्ते उत्तमकुमार जैन यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले होते.