चोरवणेत ७६ वर्षानंतर मोबाईल टॉवर कार्यान्वित

 

ग्रामस्थांचा पुढाकार, टॉवर उभारण्यासाठी विनामोबदला दिली जागा

खेड(प्रतिनिधी) तालुक्यातील चोरवणे येथे स्वातंत्र्याच्या ७६ वर्षानंतरही मोबाईल नेटवर्कचा थांगपत्ता नव्हता. यामुळे ग्रामस्थांसह शालेय विद्यार्थ्यांना याचा फटका बसत होता. अखेर ग्रामस्थांच्या पुढाकारातून टॉवर उभारण्यासाठी विनामोबदला जागा उपलब्ध करून दिल्यानंतर बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी टॉवरची उभारणी करत सेवाही कार्यान्वित केली आहे. यामुळे तब्बल ७६ वर्षानंतर गावात अखेर मोबाईल सेवा सुरू झाली आहे.