रत्नागिरी l प्रतिनीधी: ग्वाल्हैर- आग्रा घराण्याचे पतिभावान गायक आणि पं. अरूण कशाळकर. पं. शरद साठे यांचे शिष्य मुकुल कुलकर्णी यांचे सुरेल शास्त्राrय गायन आणि गोव्यातील तबलावादक अमर मोपकर यांच्या दोन शिष्यांच्या तबला एकल वादनाने यंदाची कै. लक्ष्मण गाड स्मृती संगीत सभा रंगणार आहे.
ही संगीत सभा 11 मे रोजी सायं. 5 ते रा. 8. 30वा. थिबा पŸलेस जवळील स्वामी गगनगिरी महाराज आश्रम रंगमंचावर आयोजित करण्यात आली आहे.
स्वराभिषेक संगीत वर्गाच्या संचालिका विनया परब यांचे वडील कै. लक्ष्मण गाड हे पसिध्द भजनी मास्तर होते. त्यांनी सिंधुदुर्ग व गोवा राज्यात अनेक शिष्य घडवले. त्यांच्या स्मृतिपीत्यर्थ या संगीत सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
संगीत सभेच्या पहिल्या सत्रात गोवा संगीत महाविद्यालयात अमर मोपकर यांच्या मार्गदर्शनाखाली तबल्याची तालीम घेणारे सर्वेश गावस व स्मरण सतरकर यांचे तबला एकल वादन होईल. त्यानंतर मुकुल कुलकर्णी यांचे शास्त्राrय गायन होणार आहे. कुलकर्णी यांना ग्वाल्हैर आग्रा घराण्याची तालीम मिळाली असून ते आकाशवाणीचे ए ग्रेड कलाकार आहेत.
मŸवŸढनिकल इंजिनिअर असलेल्या कुलकर्णी यांनी संगीतामध्ये पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे.भारतातील अनेक नामवंत संगीत संमेलनात त्यांनी सादरीकरण केले असून परदेशातील रसिकांनीही त्यांच्या गायकीचा आस्वाद घेतला आहे. दादर माटुंगा कल्चरल सेंटर व सीसीआरटीची शिष्यवृत्ती त्यांना मिळाली आहे.
कुलकर्णी यानी हार्मोनियम साथ गोव्यातील दत्तराज म्हाळशी व तबला साथ अमर मोपकर करणार आहेत. ध्वनी संयोजन उदयराज सावंत यांचे असून ही मैफल रसिकांसाठी विनामूल्य आहे.











