समई नृत्य व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
वैभववाडी l प्रतिनिधी : करुळ येथील जय भवानी सेवा मंडळ (सरफरे आवाट जामदारवाडी) यांच्यावतीने मंगळवार दि. १४ मे रोजी सत्यनारायण महापूजा निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे – सोमवार दि. १३ मे रोजी सकाळी ७ वा. स्थानिक परिसर स्वच्छता मोहीम, दुपारी ३ वा. लहान मुलांसाठी व महिलांसाठी विविध स्पर्धा, मंगळवार दि. १४ मे रोजी दुपारी ३ वाजता सत्यनारायणाची महापूजा, सायंकाळी ७ ते ९ वा. महाप्रसाद, रात्री ८ वाजता लहान मुलांसाठी रेकॉर्ड डान्स, नृत्य, रात्री ९ वाजता बक्षीस व सत्कार समारंभ, रात्री १० वाजता सांस्कृतिक कार्यक्रम – समई नृत्य व स्थानिक भजने. या कार्यक्रमाला भाविक व ग्रामस्थांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जय भवानी सेवा मंडळ सरफरे आवाट जामदारवाडी यांच्यावतीने करण्यात आले आहे.








