बोरजमध्ये १५ रोजी महामानवांचा संयुक्त जयंती महोत्सव

 

खेड(प्रतिनिधी) तालुका बौद्ध समाज सेवा संघ, तालुक्यातील बोरज शाखा क्रमांक ७७च्या वतीने बोरज-बौद्धवाडी
येथील पंचशिल बुद्ध विहारात १५ मे रोजी महामानवांचा संयुक्त जयंती महोत्सव आयोजित
करण्यात येणार आहे.

सकाळी ९ वाजता धम्म ध्वजारोहण, ९.३० बुद्ध वंदना व पूजापाठ, ११ वाजता सत्कार समारंभ, दुपारी १ वाजता स्नेहभोजन, ३ वाजता सांस्कृतिक
कार्यक्रम व रात्री ९ वाजता मुंबई येथील उषा सेजुले व लवेल येथील संजय गमरे व पार्टी यांचा कव्वालीचा जंगी सामना होणार आहे.

महामानवांच्या संयुक्त जयंती महोत्सवाला बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन बोरज माता रमाई मंडळ, पंचशिल शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक ट्रस्ट, पंचशिल युवा मंडळाने केले आहे.