कुडोशी जि. प. शाळेच्या शिक्षिका विनिता धामणेंचे निधन

 

खेड(प्रतिनिधी) तालुक्यातील जिल्हा परिषद कुडोशी शाळेत प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या विनिता विलास धामणे (५३) यांचे रविवारी रात्री अल्पशः आजाराने निधन झाले. तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे ज्येष्ठ नेते व दापोली येथे कार्यरत असलेले केंद्रप्रमुख विलास धामणे यांच्या त्या पत्नी होत.

शिक्षक पतपेढीच्या त्या माजी संचालिकाही होत्या. संचालक पदाच्या माध्यमातून शिक्षकांच्या समस्या जाणून घेत त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला होता. मनमिळावू व विद्यार्थीप्रिय आदर्श शिक्षिका म्हणून त्या परिचित होत्या. चिपळूण
तालुक्यातील वहाळ येथील मूळगावी त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले
त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच सर्वच स्तरांतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.