खेड (प्रतिनिधी) येथील आयसीएस महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. संजय पाटोळे वय ६० यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी एक मुलगा व सून असा परिवार आहे.
३० एप्रिलला डॉ. पाटोळे हे सेवानिवृत्त झाले होते. त्यानंतर त्यांना कोल्हापुर येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथेच उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. सहजीवन परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.











