Shri Hanuman Janmotsav celebration at Bamanoli Kizbilewadi on 6th
संतोष कुळे | चिपळूण : तालुक्यातील बामणोली येथील नवजवान मित्र मंडळ किजबिलेवाडी संलग्न श्री हनुमान सेवा महिला मंडळ किजबिलेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक 6 एप्रिल रोजी श्री हनुमान जन्मोत्सव व 46 वा वर्धापन दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.गुरुवार दि. ६ रोजी सकाळी ६.३० वाजता श्री हनुमान जन्मोत्सव, सकाळी ११ वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारी १२ ते १ वाजता श्री हनुमान सेवा महिला मंडळ हळदीकुंकू समारंभ, दुपारी १ ते ३ वाजता भंडारा, सायंकाळी ३ ते ७ वाजता श्री हनुमान पालखीची भव्य मिरवणूक सायंकाळी ७ ते रात्री ९ वाजता भंडारा रात्री ९ ते १० वाजता स्थानिक भजने, रात्री १० ते १०.३० वाजता मान्यवरांचा सत्कार व शैक्षणिक बक्षीस वितरण समारंभ आणि रात्री ११ वाजता श्रीपालेश्वर नमन नाट्य मंडळ मोजे पालीवाडी शाखा क्रमांक १ तालुका गुहागर यांचे बहुरंगी नमन अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.दरवर्षीच नवजीवन मित्र मंडळ किजबिले वाडी व महिला मंडळाच्या वतीने कार्यक्रम साजरे केले जातात. सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आणि इतर क्षेत्रातले कार्यक्रमाचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम मंडळ करते. या जन्मोत्सव सोहळ्याला भाविकांनी उपस्थित राहावे, असे मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.