भरणे जगबुडी पुलावर कंटेनरला अपघात, चालक नदीपात्रात कोसळला

खेड(प्रतिनिधी)
मुंबई गोवा महामार्गा वरील भरणे येथील नव्या जगबुडी पुलावर चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर दोन्ही पुलाच्या मध्य भागी असलेल्या दुभाजकावर आदळला या अपघाता मध्ये कंटेनर चालक मात्र नदी पात्रात कोसळून गंभीर रित्या जखमी झाला हा अपघात शनिवारी रात्री १०.३० वा च्या सुमारास घडला
जगबुडी पूलावरील अपघाती वळण अपघाताना निमंत्रण देणारे ठरत असून या ठिकाणी अनेक अपघात होऊन अनेकांनी जीव देखील गमावला आहे असाच अपघात शनिवारी रात्रौ च्या सुमारास घडला चालकाला पूलावरील वळण चा अंदाज न आल्याने कंटेनर वरील नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट दुभाजकाला धडकला ही धडक इतकी भीषण होती की चालक नदी पात्रात कोसळला यामध्ये तो गंभीर जखमी झाला
या अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच स्थानिक पोलीस तसेच कशेडी वाहतूक शाखेचे कर्मचारी रेस्कु टीम मदत ग्रुप च्या स्वयंसेवकांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले नदी पात्रात कोसळलेल्या चालकाला बाहेर काढून  मदत ग्रुप चे प्रसाद गांधी यांनी जखमी चालकाला खासगी रुग्णालयात दाखल केले
दरम्यान , नव्या जगबुडी पुलावर दिवे आहेत मात्र ते अद्यापि कार्यान्वित न केल्याने अंधारात च पुलावरून वाहने हाकावी लागत असल्याने अपघातामध्ये वाढ देखील झाली आहे आधीच अपघाती वळणदार पूल अन असलेला अंधार यामुळे कल्याण टोलवेज कंपनी व अधिकारी यांच्या बाबतीत नागरिका मधून संताप व्यक्त होत आहे