ॲड. अनिल केसरकर यांची मागणी
सावंतवाडी : सावंतवाडी इन्सुली मार्गावरील इन्सुली घाटात तसेच मळगाव घाटात अनेक झाडे धोकादायक अवस्थेत असून पावसाळ्यात ही झाडे रस्त्यावर अथवा वाहनचालकांवर पडून जिवीत अथवा वित्त हानी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ही झाडे त्वरीत तोडण्यात यावीत, अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी केली आहे.
मळगांव व इन्सुली घाटातील धोकादायक झाडे मार्गावर कोसळण्याचे प्रकार यापूर्वी अनेक वेळा घडलेले आहेत. पावसाळा तोंडावर आला असताना देखील सार्वजनिक बांधकाम विभाग सुशेगात असून या मार्गावरील तसेच मळगाव घाटातील सर्व धोकादायक झाडांचा तातडीने सर्वे करण्यात यावा व या मार्गांवरील अशी झाडे तातडीने तोडून टाकावीत अन्यथा पावसाळ्यात या मार्गावर झाडे पडून जिवीत अथवा वित्त हानी झाली तर त्याला सर्वस्वी सार्वजनिक बांधकाम विभाग व वन खात्याला जबाबदार धरण्यात येईल असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी दिला आहॆ.












