सावंतवाडी । प्रतिनिधी : कोकण बोर्डाच्या वतीने फेब्रुवारी २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा सावंतवाडी तालुक्याचा निकाल ९९ टक्के लागला आहे. सावंतवाडी तालुक्यात ८७१ मुले व ८३४ मूली मिळून एकूण १७०५ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ८५८ मुले तर ८३० मुली मिळून एकूण १६८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.











