माखजन |वार्ताहर :
संगमेश्वर तालुक्यातील माखजन बसस्थानकातील परिसराची अल्पावधीतच दुरावस्था झाली आहे.
वर्षांपूर्वी या बसस्थानकात डांबरीकरण करण्यात आले होते.अल्पावधीत पुन्हा परिसर खडीमय झाला आहे. माखजन बस्स्थानाच्या बाजूने गटाराची ठोस सोय केली जात नसल्याने हा प्रकार गेली कित्येक वर्षे होत आहे.पावसाळ्यात बसस्थानकात मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याचा प्रकार होत असतो.याचा त्रास परिसरातील प्रवाशांना होत आहे.याकडे विभागिय देवरुख आगराने लक्ष घालावे अशी मागणी माखजन परिसरातील प्रवाशामधून होत आहे.










