कणकवलीत २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांच्या स्मृतींना दिला उजाळा

कणकवली
मुंबई येथील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांना मंगळवारी संविधानदिनी कणकवलीवासीयांनी आदरांजली वाहिली. कणकवली पोलीस ठाण्याच्या आवारात वंदे मातरम लिहत मेणबत्ती प्रज्वलित करून उपस्थित सर्व नागरिक नतमस्तक झाले. तसेच यावेळी संविधानाच्या प्रीयांबलचे वाचन करण्यात आले.

“आम्ही कणकवलीकर” यांच्यावतीने या श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी मेणबत्ती प्रज्वलित करून ‘वंदे मातरम’ ची प्रतिकृती साकारण्यात आली होती. यावेळी तहसीलदार दीक्षांत देशपांडे, पोलीस निरीक्षक मारुती जगताप, निरीक्षक, सचिन हुंदळेकर, अँड. उमेश सावंत, तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर, बाळू मेस्त्री, हनिफ पिरखान, श्याम सावंत, प्रदीप मांजरेकर, अनुप वारंग, सादिक कुडाळकर, वि.के. सावंत, श्री सकपाळ, महानंद चव्हाण, प्रा. मुंबरकर, प्रा. सुरेश पाटील, श्रीमती. कामत ,प्रदीप मांजरेकर,विनायक सापळे,तनवडे सर, आदी उपस्थित होते. सौ.माने यांनी संविधानाच्या प्रीयांबलचे वाचन केले. पोलीस अधिकारी कर्मचारी व कणकवलीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तहसीलदार दीक्षांत देशपांडे, मारुती जगताप, अँड. उमेश सावंत यांनी मनोगत व्यक्त केले.