धनजी नाका येथे बंद घरातून सव्वा लाखांची चोरी
रत्नागिरी ः प्रतिनिधी
शहरातील धनजीनाका येथील घडफोडी करत अज्ञाताने रोख 1 लाख 16 हजार 500 रुपये लांबवले. चोरीची ही घटना गुरुवार 9 मे रोजी सकाळी 6 ते शनिवार 18 मे रोजी सकाळी 11 वा. कालावधीत घडली आहे.
याबाबत शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार,गुरुवार 9 मे ते शनिवार 18 मे या कालावधीत ते कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. या संधीचा फायदा उठवत अज्ञाताने त्यांच्या घरातील किचनच्या उघड्या खिडकीतून आत प्रवेश करत रोख 1 लाख 16 हजार 500 रुपयांची रक्कम चोरुन नेली. याप्रकरणी अज्ञाताविरोधात भादंवि कायदा कलम 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












