रत्नागिरी ः प्रतिनिधी
तालुक्यातील जाकादेवी-खालगाव येथील बंद घर फोडून अज्ञाताने सोन्या-चांदीचे दागिने,दुचाकी असा एकूण 73 हजार रुपयांचा ऐवज लांबवला. त्याचवेळी घरात ठेवलेली किल्ली घेत अंगणातल्या दुचाकीवर बसून पलायन केले. ही घटना सोमवार 20 मे रोजी सायंकाळी 7 ते गुरुवार 23 मे रोजी सकाळी 6 वा.कालावधीत घडली आहे.
याप्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, ते आपल्या कुटुंबासह गावी पूण्याला गेले होते. या संधीचा फायदा उठवत अज्ञाताने त्यांच्या घराच्या मागील दरवाजाचा कडी-कोयंडा कोणत्यातरी हत्याराने उचकटून घरात प्रवेश केला. त्यानंतर कपाट आणि पलंगात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने तसेच दुचाकी घेउन पोबारा केला. यामध्ये चोरट्याने 20 हजार रुपये किमतीची २ ग्रॅम वजनाची सोन्याचे ३ कॉइन, 17 हजार रुपये किमतीचे ५ ग्रॅम वजनाचा सोन्याचे बिस्किट, ८ हजार रुपये किमतीचे २ ग्रॅम वजनाची सोन्याची कर्णफुले, ५ हजार रुपये किमतीचे १ ग्रॅम वजनाची सोन्याची नथ, ८ हजार रुपये किमतीचे चांदीचे बिस्किट हा ऐवज आपल्या पोतडीत भरला. त्याचवेळी चोरट्याला घरात ठेवलेली दुचाकी स्प्लेंडर प्लस मोटरसायकल एम एच ०८ – 8937 ही तसेच पंधरा हजार रुपये किमतीची गाडी घेऊन पळून गेला.
याप्रकरणी अज्ञाताविरोधात भादंवि कायदा कलम 454,457,380 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









