दहावी परीक्षेचा तालुक्याचा निकाल ९६.९९ टक्के
लांजा (प्रतिनिधी) सोमवारी जाहीर झालेल्या दहावी परीक्षेचा तालुक्याचा निकाल हा ९६.९९ टक्के इतका लागला असून न्यू इंग्लिश स्कूल लांजाच्या हर्ष हेमचंद्र कस्तुर याने ९७.८० टक्के गुणांसह तालुक्यात अव्वल क्रमांक पटकावला आहे.
दहावी परीक्षेसाठी तालुक्यातील विद्यालयातून बसलेल्या ११३७ विद्यार्थ्यांपैकी १०९७ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन लांजा तालुक्याचा एकूण निकाल (९६.९९) टक्के इतका लागला. यामध्ये लांजा शहरातील न्यू इंग्लिश स्कूल मधील हर्ष हेमचंद्र कस्तुर याने (९७.८०) टक्के मिळवत तालुक्यात अव्वल तर न्यू इंग्लिश स्कूल लांजा मधीलच श्रेया कुंडलिक जांभळे (९७.००) टक्के गुण मिळवून द्वितीय व विद्यादिप इंग्लिश मिडीयम स्कूल लांजाची रक्षा संदीप नाडणकर हिने (९५.८०) टक्के मिळवून तालुक्यात तृतीय क्रमांक पटकावला.
त्याचप्रमाणे तालुक्यातील १७ विद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. लांजा तालुक्यातील न्या.वै.वी आठल्ये विद्यामंदिर शिपोशी, सरस्वती माध्यमिक विद्यामंदिर रिंगणे, श्रीराम विद्यालय वेरवली, श्री रामेश्वर विद्यालय कोंडगे, आदर्श विद्यामंदिर प्रभानवल्ली, उर्मिला माने विद्यालय आसगे, श्री सरस्वती विद्यानिकेतन खावडी, आदर्श विद्यामंदिर देवधे, श्री आदीष्टी विद्यामंदिर गोविळ, न्यू इंग्लिश स्कूल जावडे, कै.एकनाथ राणे इंग्लिश मीडियम स्कूल लांजा, नवलाई माध्यमिक विद्यामंदिर खानवली, रुक्मिणी भास्कर विद्यालय व्हेळ, न्यू इंग्लिश स्कूल कोचरी, न्यू इंग्लिश स्कूल पुनस, विद्यादीप इंग्लिश स्कूल लांजा, डी.जे.सामंत इंग्लिश मिडियम स्कूल लांजा आदी १७ विद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे
तालुक्यातील इतर निकाल पुढीलप्रमाण
न्यू इंग्लिश स्कूल, लांजा
न्यू इंग्लिश स्कूल लांजाचा एकूण निकाल ९४.४८ टक्के लागला आहे. त्यामध्ये प्रथम हर्ष हेमचंद्र कस्तुर (९७.८०), द्वितीय श्रेया कुंडलिक जांभळे (९७.००) तृतीय वेदा भिमदास कदम ( ९५.००) टक्के मिळवत यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकावले.
__________________________________
प्रतापराव माने विद्यालय, भांबेड
प्रतापराव माने विद्यालयाचा एकूण निकाल ९६.६६ टक्के लागला आहे. त्यामध्ये सेमी इंग्रजीत प्रथम प्रणव श्रीपत इंदुलकर (९२.८०) द्वितीय सिद्धी विजय गुरव (८९.२०) तृतीय ईशा दिनेश भालेकर (८७.४०) तर मराठी माध्यम मध्ये श्रवण संतोष मोरे (७२.६०) सोनाली शामसुंदर गुरव (६८.६०) गितांजली मनोहर गुरव (६५.२०) टक्के मिळवत यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकावले.
______________________________
अल-अमिन उर्दू हायस्कूल, लांजा
अल-अमिन उर्दू हायस्कूलचा एकूण निकाल ९२.३० टक्के लागला आहे. त्यामध्ये प्रथम इफत खुदबुद्दिन हाजू (८३.००) द्वितीय आलिशा वसिम तांबोळी (८०.००) तृतीय आसिया फिरोज मुजावर (७७.००) यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकावले.
_______________________________
रा.सि.बेर्डे विद्यालय, सापुचेतळे
रा.सि. बेर्डे विद्यालयचा एकूण निकाल ९८.८२ टक्के लागला असून त्यामध्ये प्रथम सानिका संतोष नारकर (८७.६०), द्वितीय स्नेहल संतोष कोकरे (८५.८०) तृतीय सार्थक सुरेश कोकरे (८५.२०) टक्के मिळवत यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकावले.
______________________________
रा.सि.बेर्डे विद्यालय, साटवली
रा.सि.बेर्डे विद्यालय साटवलीचा एकूण निकाल ९३.०२ टक्के लागला आहे. त्यामध्ये प्रथम मुनज्जाह मुनोर ईसफ (९४.२०) द्वितीय पूजा महेश जाधव (८८.४०) तृतीय सोनल शिवजी पराडकर (७९.४०) टक्के मिळवत यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकावले.
____________________________
बॅ.नाथ पै व कनिष्ठ महाविद्यालय, हर्चे
बॅ.नाथ पै विद्यालयाचा एकूण निकाल ९४.७३ टक्के लागला आहे. त्यामध्ये प्रथम अविशी राजेंद्र माळी (९३.००) द्वितीय रिया संदीप माळी (८६.४०) तृतीय चंदना वसंत कुवार (८३.२०) टक्के मिळवत यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकावले.
——————————
माध्यमिक आश्रमशाळा, जावडे
माध्यमिक आश्रम शाळा जावडेचा एकूण निकाल ९६.१५ टक्के लागला आहे. त्यामध्ये प्रथम मधुरा मकरंद आयरे (७९.१५) द्वितीय मनोज्ञ मनोज लांजेकर (७८.२०) तृतीय साई ज्ञानेश्वर राऊत (७२.००) टक्के मिळवत यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकावले.
_____________________________
ज.गं.पेडणेकर माध्यमिक विद्यालय, तळवडे
ज.गं.पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडेचा एकूण निकाल ९३.०२ टक्के लागला आहे. त्यामध्ये विभागून स्वरांगी पांचाळ व अथर्व पाटोळे (८९.४०) द्वितीय शुभम भितळे (८५.८०) तृतीय संस्कृती पाटोळे (८५.४०) टक्के मिळवत यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकावले.
______________________________
न्यू इंग्लिश स्कूल, वनगुळे
न्यू इंग्लिश स्कूल वनगुळेचा निकाल ९०.६२ टक्के लागला आहे. त्यामध्ये प्रथम नंदाई गणेश गुरव (८४.२०) द्वितीय शिवम दिनेश निवळे (७६.२०) तृतीय अमिषा संजय पवार (७३.४०) टक्के मिळवत यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकावले.
दरम्यान, तालुक्यातील यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.









