माखजन |वार्ताहर
संगमेश्वर तालुक्यातील माखजन, आरवली,करजुवे परिसरात भात पेरणीला प्रारंभ करण्यात आला आहे.
हवामान खात्याने १० जुन ला मान्सून चे आगमन होईल असा अंदाज वर्तवला आहे.या पार्श्वभूमीवर मान्सून पूर्व सरी बरसतील हे लक्ष्यात घेऊन शेतकऱ्यांनी पेरणीला सुरवात केली आहे.
बहुतांश शेतकरी संकरीत बियाण्याचा वापर करताना दिसत आहेत.पारंपरिक भात बियाणी आता कालबाह्य होऊ लागली आहेत.वाढत्या उष्म्यामुळे शेतकरी सकाळच्या वेळी पेरणी करणे पसंद करत आहेत.












