लांजा (प्रतिनिधी) लांजा नगरपंचायत कार्यक्षेत्रात येणाऱ्या देवराई भागात सध्या भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. या ठिकाणी नगरपंचायतीमार्फत टॅंकरद्वारे केला जाणारा पाणीपुरवठा हा कमी असल्याने येथील नागरिकांचे पाण्यावाचून मोठे हाल होत आहेत.
लांजा नगरपंचायत च्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या देवराई या भागात मे महिन्यात येतील ग्रामस्थांना पाणी टंचाईला सामोर जावे लागते. या ठिकाणी असणारी बेनी नदी आटल्याने येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. जलस्त्रोत आटल्याने आणि विहिरींची पाणी पातळी खालावल्याने येथील ग्रामस्थांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. सध्या या भागातील ग्रामस्थांना लांजा नगरपंचायतीमार्फत एका टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे .मात्र हा पाणीपुरवठा अपुरा असल्याने पाण्यापासून येथील ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे.
नगरपंचायतीमार्फत केला जाणारा पाणीपुरवठा हा येथील ग्रामस्थांना पुरेसशा प्रमाणात नसल्याने नगरपंचायतीने आणखी एका टँकरद्वारे या ठिकाणी पाणीपुरवठा करावा आणि येथील ग्रामस्थांची पाण्यावाचून होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी येथील ग्रामस्थांतून केली जात आहे.









