सावंतवाडी । प्रतिनिधी : निरवडे – कोनापाल येथील रहिवासी सिताबाई रामचंद्र गावडे ( ८५ ) यांचे गुरुवारी रात्री १०.४५ वाजताच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, चार मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रमोद गावडे यांच्या त्या आई तर सावंतवाडी पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. प्रियांका गावडे यांच्या त्या सासू होत.












