महायुतीची निष्ठा व महायुतीचे ऐक्य कायम ठेवा

 

पुढच्या सर्व निवडणुका महायुती मधून लढवू 

मतमोजणीनंतर रत्नागिरी येथे विजयाच्या आनंदोत्सवात सामील व्हा. –                   केंद्रीय मंत्री नारायण राणे 

 

कुडाळ l प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या माझ्या प्रचारासाठी महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, नेत्यांनी मेहनत घेतली व निष्ठेने काम केले त्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सर्वांचे आभार मानले. रत्नागिरी येथील मतमोजणीनंतर आपल्या विजयाच्या आनंदोत्सवात सामील व्हा अशी त्यानी सर्वांना विनंती केली. महायुतीच्या कार्यकर्त्यांचे बळ फार मोठे आहे. कोकण पदवीधर निवडणुकीसह पुढच्या सर्व निवडणुका महायुतीतून लढवू व महायुतीची निष्ठा व महायुतीचे ऐक्य कायम ठेवू, असे आवाहनही त्यांनी कुडाळ येथे झालेल्या महायुतीच्या बैठकीत केले.

भाजपच्या जिल्हा कार्यकारणी, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना महायुतीच्या बैठकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मतमोजणीनंतरचा महायुतीचा विजयोत्सव व 26 जून रोजी होत असलेली कोकण पदवीधर मतदार संघाची निवडणूक याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी भाजप नेते आमदार नितेश राणे, अतुल काळशेकर भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय आंग्रे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित नाईक व अशोक दळवी, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी सुरेश गवस, सौ श्वेता कोरगावकर सौ वर्षा कुडाळकर आधी महायुतीचे पदाधिकारी व्यासपीठावर होते. कुडाळ येथील महालक्ष्मी हॉलमध्ये माहितीची ही बैठक संपन्न झाली. मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

नारायण राणे म्हणाले की, पदवीधर निवडणुकीत विजयी होण्यासाठी आपण सर्व सज्ज आहोत.लोकसभेत महायुती कडून उमेदवारी दिली.सर्वानी चांगलं काम केले त्यामुळे ४ जुन्या मतमोजणी सुरू होईल त्यावेळी आपण सर्वांनी उपस्थित राहावे अशी विनंती करतो.आपण मेहनत केली म्हणून विजय निश्चित आहे.आता पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होणार आहे.एका बाजूला हा विजय घेणार त्यामुळे दुसऱ्या बाजूला पदवीधर उमेदवार जोशात विजयी होईल.पदवीधरची निवडणूक वेगळी आहे.आपल्या तिन्ही पक्षाची कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे त्यामुळे आपला विजय निश्चित आहे.केद्रांत व राज्यात सत्ता आपली आहे त्यामुळे विजय आपलाच आहे.आमचा विश्वास पक्षाचा विश्वास सार्थकी कराल असा आम्हाला विश्वास आहे.दहावी, बारावीच्या गुणांप्रमाणे आपले कार्यकर्ते अव्वल आहेत हे सिध्द करा.सर्वानी सलोख्याने काम करावे,ही युती अखंड राहावी असं आपलं मत आहे,आपले हे ऐक्य असंच कायम ठेवा असे आवाहन केले.भाजपने मला या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दिली व महायुतीच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. पालकमंत्री व राज्याचे जेष्ठ मंत्री रवींद्र चव्हाण, शिक्षण मंत्री दीपक उद्योग मंत्री उदय सामंत आधी सर्वांनी काम केले त्याबद्दल मी आभारी आहे. असेही नारायण राणे म्हणाले.

 

लोकसभेला यश निश्चित : कोकण पदवीधर मध्ये ही यश मिळवू! सार्व. बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण

 

कोकण पदवीधर मध्ये पाच जिल्ह्यांत मतदार आहेत.हा मैठा मतदार संघ आहे.या आमदाराला ३९ मतदार संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळते.शिक्षक आणि पदवीधर मध्ये वरच्या स्थानी या आमदारांना स्थान दिले जाते.या मतदार संघात २ लाख ३० हजार मतांची नोंदणी होणे अपेक्षित आहे.नोंदवलेलं मतदान शोधून काढणे ही आपली परिक्षा आहे.निवडणूक गंभीरपणे घ्या.ठिकठिकाणी मतदारांचे मेळावे घेऊन मतदान कसं करावं हे सांगणं आवश्यक आहे.आपल्या निरंजन डावखरे यांना सिंगल लाईन करून मतदान करणे आवश्यक आहे.आपल्याला जिंकायचं आहे त्यासाठी न चुकता मतदान केले पाहिजे.कार्यकत्यांनी मतदारांना वाटुन घ्या व मतदारांना बाहेर काढा.लोकसभेत आपण यशस्वी होणार हे निश्चित आहे.सर्वानी आपला आनंदोत्सव साजरा करण्यासाठी सर्वांनी उपस्थित रहा असे आवाहन केले. कोकण पदवीधर निवडणूकीला विशेष महत्त्व आहे. पालघर पासून सिंधुदुर्ग पर्यंत पाच जिल्ह्यांचा यात समावेश आहे. एकूण ३९ आमदारांच्या कार्यक्षेत्रातील ही निवडणूक आहे. दोन लाख तीस हजार मतदार आहेत. कोकण पदवीधर विधान परिषद सदस्याला विशेष मान असतो. या आमदारांना वरचे स्थान असते. त्यामुळे ही निवडणूक महत्त्वाची असून निरंजन डावखरे हे महायुतीचे उमेदवार म्हणून सर्वांनी काम करा असे आवाहनही त्यांनी केले.

 

जसा विजय ऐतिहासिक तसा जल्लोशाही ऐतिहासिक होईल : आम नितेश राणे

 

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा विजय निश्चित आहे हा विजय ऐतिहासिक होईलच तर या विजयाचा जलोषही तसाच ऐतिहासिक व्हायला हवा… हिशोब चुकता करणार तोही व्याजासकट करणार आहोत, चव्हाण साहेब तुम्ही जरा कार्यकर्त्यांना सांभाळून घ्या अशी विनंती ही त्यांनी केली. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत आपल्या माध्यमातून विजयी निवडणूक व्हायला हवी त्या दृष्टीने काम करा.मतदाराची काळजी करु नका ते आपल्या ला शोधत येतील.या पदवीधर निवडणुकीत मतदान बाद होण्याचे प्रमाण खुबी आहे.पदवीधर निवडणुकीत निरंजन डावखरे यांना चांगलं मतदान झाले पाहिजे, त्यादृष्टीने काम झालं पाहिजे हे लक्षात ठेवा.आता आपल्याला कुठं थांबायचं नाही हे लक्षात ठेवा. हा विजयाचा आनंद 4 जूनला साजरा करूया. रत्नागिरी इथून सुरू झालेली विजयाची मिरवणूक ऐतिहासिक करू. या मिरवणुकीचे रत्नागिरीतून निघालेलेपहिले टोक सिंधुदुर्गात पोहोचेल तेव्हा शेवटचे टोक रत्नागिरीत असेल असा विजय आनंदोत्सव साजरा करूया, असे आमदार नितेश राणे यांनी आवाहन केले.

 

भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत म्हणाले केंद्रीय मंत्री नारायण राणे व मोदी सरकारच्या विजयाच्या जल्लोषाचे नियोजन करण्यात आले. रत्नागिरी येथे मतमोजणी असून मतमोजणीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणारा भाजपचा जल्लोष ऐतिहासिक असेल असे नियोजन करण्यात आले. भाजपाच्या स्थापनेपासून कमळ चिन्हावर प्रथमच खासदार विजयी होणार आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या रूपाने या मतदारसंघाची ऐतिहासिक परंपरा कायम राहत असून महाराष्ट्रातील आणि कोकणातील या जिल्ह्यातील एक धडाडीचे कर्तुत्ववान नेतृत्व पुन्हा एकदा मोदी सरकार मध्ये स्थान मिळविणार आहे. या भागातील विकासाला चालना देणारे कोकणच्या विकासाला गती देणारे अभ्यास व बुलंद नेतृत्व म्हणून त्यांची कीर्ती आहे. म्हणूनच त्यांचा विजय व या विजयाचा जल्लोष असेही ते म्हणाले. भाजप नेते अतुल काळशेकर, प्रमोद रावराणे यांनी कोकण पदवीधर मतदार संघाबाबत मार्गदर्शन केले. संजय आंग्रे,अबिद नाईक,अशोक दळवी यांनी महायुतीने केलेले काम व आगामी निवडणुकांचे नियोजन याबाबत मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन रणजित देसाई यांनी केले.