कोकण पदवीधर साठी पुन्हा आ. निरंजन डावखरे
रत्नागिरी : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाकडून विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघासाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.
त्यामध्ये कोकण विभागात कोकण पदवीधर मतदारसंघासाठी भाजपाकडून विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांच्या नावाची घोषणा झाली. तर मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी किरण रवींद्र शेलार आणि मुंबई शिक्षक मतदार संघासाठी शिवनाथ हिरामण दराडे यांच्या नावाची घोषणा भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय समितीने 3 जून रोजी एका परिपत्रकाद्वारे केली आहे.
या कोकण पदवीधर मतदारसंघांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून तसंच उबाठा गटाकडूनही उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे या निवडणुकीत रंगत येणार आहे.












