जनतेने राणे साहेबांचा विजय निश्चित केला!

 

भाजपा मालवण महिला तालुकाध्यक्ष पुजा करलकर यांनी मानले सर्वांचे आभार : मालवण भाजप कार्यालयात एकमेकांना पेढे भरवत विजयी आनंद साजरा

मालवण | प्रतिनिधी : विकासाचे धोरण ठेवत रत्नागिरी सिंधुदुर्ग मधील जनतेने उत्स्फूर्तपणे राणे साहेबांना मतदानरुपी आशीर्वाद देतं विजयी केले. हा विजय जनतेचा आहे, मेहनत घेणाऱ्या भाजपा महायुती पदाधिकारी कार्यकर्ते यांचा आहे. असे सांगत भाजपा महिला तालुकाध्यक्ष पुजा करलकर यांनी विजय जनतेचा असल्याचे सांगितले.

भाजप नेते कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांच्या नेतृत्वात महायुती सर्व पदाधिकारी कार्यकर्ते एकजुटीने कार्यरत होते. सर्वांच्या मेहनतीचा हा विजय आहे. असेही पुजा करलकर यांनी सांगितले.

यावेळी पुजा करलकर, शर्वरी पाटकर, पुजा सरकारे, ममता वराडकर, पुजा वेरलकर, महानंदा खानोलकर, महिमा मयेकर, प्रमिला रेडकर, वैशाली जाधव, भाग्यश्री ढोलम, तुलसी चव्हाण, तसेच प्रमोद करलकर,सौरभ ताम्हणकर, राजु बिडये, राजेश पारकर, संजू आचरेकर, भाई मांजरेकर, बाबू कासवकर, नितेश पेडणेकर, राजा मांजरेकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.