देवगड (प्रतिनिधी)
हिंदळे भटवाडी येथील अशोक पांडुरंग हिंदळेकर यांच्या तेथील कार्तिक स्वामी मंदिरासमोरील कलम बागेला आग लागून सुमारे 35 कलमे होरपळली आहेत. ही घटना 31 मे रोजी सायंकाळी 4.30 वा. च्या सुमारास घडली असून या घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात बुधवारी करण्यात आली आहे.











