देवगडमध्ये नारायण राणे यांचा लोकसभेतील विजय मिरवणूक काढून साजरा

रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून जनतेने  महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना खासदार म्हणून निवडून संसदेत पाठवले. देवगड तालुक्याने या यशात मोठ्या प्रमाणात मताधिक्य दिले आहे  देवगडमध्ये मिरवणूक काढून नारायण राणे यांच्या लोकसभेतील विजयाचा आनंद साजरा करण्यात आला

आमदार नितेश राणे यांच्यासह माजी आमदार अजित गोगटे, बाळ खडपे, डॉक्टर अमोल तेली प्रकाश राणे, अरिफ बगदादी यांच्यासह सर्व नगरसेवक कार्यकर्ते यांनी या रॅलीमध्ये सहभाग दर्शवला होता

देवगड जामसंडे गावची ग्रामदेवता दीर्बा देवी रामेश्वर यांच्या मंदिरापासून देवगड स्टॅन्ड पर्यंत ही रॅली नेण्यात आली

अनेक युवक कार्यकर्ते यामध्ये आनंदाने सामील झाले होते डीजेवर संगीत लावून बेधुंदपणे आनंद साजरा करण्यात आला. सर्वांच्या चेहऱ्यावर समाधानाची भावना दिसून येत होती